ENG vs AUS : ऑस्ट्रेलियात 'सेंच्युरी मशीन' Joe Root ने रचला इतिहास, 41 व्या शतकानंतर क्रिकेटच्या देवाचा महान रेकॉर्ड धोक्यात!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Joe Root equals Ricky Ponting Test hundred : गेल्या 5 वर्षांत रूटने तब्बल 24 शतके ठोकली असून आता त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस हे दोनच दिग्गज उरले आहेत.
advertisement
1/7

जो रूटने आज सिडनीमध्ये आपल्या कारकिर्दीतील 41 वं शतक पूर्ण केलं असून यासह रूटने महान फलंदाज रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रूटने अवघ्या 146 बॉल्समध्ये हे शतक झळकावलं.
advertisement
2/7
जो रूटचं 2026 या सालातील पहिलं शतक ठरलं. यापूर्वी त्याने 4 डिसेंबर 2025 रोजी ब्रिस्बेनमध्ये पिंक बॉलने शतक साजरं केलं होतं, मात्र रेड बॉलने ऑस्ट्रेलियात शतक ठोकण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.
advertisement
3/7
रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडने लंचपर्यंत 6 बाद 336 धावांचा टप्पा गाठला असून मालिकेतील दुसरी कसोटी नावावर करण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय. रुटच्या शतकानंतर आता सचिन तेंडूलकरचा 51 शतकाचा रेकॉर्ड धोक्यात आलाय.
advertisement
4/7
गेल्या 5 वर्षांत रूटने तब्बल 24 शतके ठोकली असून आता त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस हे दोनच दिग्गज उरले आहेत. 2021 पासून सातत्याने धावांचा पाऊस पाडणाऱ्या रूटने पुन्हा एकदा स्वतःला या कसोटीमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज सिद्ध केलं आहे.
advertisement
5/7
रूटची गेल्या काही वर्षांतील आकडेवारी अत्यंत थक्क करणारी आहे. गेल्या 5 वर्षांत त्याने एकूण 24 कसोटी शतके ठोकली आहेत. 2021 मध्ये 6, 2022 मध्ये 5 शतकं, 2023 मध्ये 2, 2024 मध्ये 6 आणि 2025 मध्ये 4 शतके पूर्ण केल्यानंतर 2026 या नवीन वर्षातील हे त्याचे पहिलेच शतक ठरले आहे.
advertisement
6/7
गेल्या 2 वर्षांतील त्याची कामगिरी पाहिली तर 17 वेळा अर्धशतकी टप्पा ओलांडल्यानंतर तब्बल 11 वेळा त्याने त्याचे रूपांतर शतकात केलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा तो 72 धावांवर खेळत होता.
advertisement
7/7
इंग्लंड सध्या 5 मॅचच्या या सिरीजमध्ये 3-1 ने पिछाडीवर आहे. तरीही ही मॅच जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेल्या इंग्लंडला महत्त्वाचे 12 गुण मिळतील, जे त्यांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियात 'सेंच्युरी मशीन' Joe Root ने रचला इतिहास, 41 व्या शतकानंतर क्रिकेटच्या देवाचा महान रेकॉर्ड धोक्यात!