Rinku Rajguru : 'माझी फॅमिली या नात्यासाठी आनंदी नाही', त्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Relationship : अभिनेत्री रिंकू राजगुरूला तिच्या रिलेशनशिपबाबत अनेकदा विचारलं जातं. रिंकू पहिल्यांदा तिच्या अशा एका रिलेशनबद्दल सांगितलं. ज्यासाठी तिचं कुटुंब आनंदी नाहीये.
advertisement
1/9

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा 'आशा' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळतंय. सिनेमा हाऊसफुल्ल चालतोय. रिंकू देखील तिच्या कामामुळे खूश आहे.
advertisement
2/9
एकीकडे 'आशा' सारखा सिनेमा, ज्यात तिनं स्वत: आशा सेविकेची भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे रिंकू लावणीवर थिरकताना दिसली. तिच्या लावणीचंही चाहत्यांनी कौतुक केलं.
advertisement
3/9
सगळीकडे सध्या रिंकूचीच चर्चा पाहायला मिळतेय. सैराटची रिंकू आणि आताची रिंकू यांच्यात खूप फरक जाळवतोय. सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतींमध्ये रिंकूचे विचार, नात्यांबद्दलची तिची समजूत हे सगळं पाहायला मिळालं.
advertisement
4/9
दरम्यान रिंकू राजगुरू रिलेशनमध्ये आहे का? ती लग्न कधी करणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून तिला विचारले जातात. रिंकूला सध्याच्या Gen Z रिलेशनशिपवर अजिबात विश्वास नाही, तिला ती कॉन्सेप्ट पटत नाही असं तिनं स्पष्ट सांगितलं आहे.
advertisement
5/9
दरम्यान रिंकूने तिच्या एका रिलेशनबद्दल पहिल्यांदाच बोलली आहे. तिचं ते रिलेशन तिच्या कुटुंबाला मान्य नाही. ते त्या नात्याबद्दल आनंदी नाहीत असं त्यात पाहायला मिळतंय.
advertisement
6/9
रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो, व्हिडीओ, सिनेमाचं प्रमोशनल करताना ती सोशल मीडियावर दिसते. पोस्टप्रमाणेच रिंकू इन्स्टाग्राम स्टोरीवरही अनेक पोस्ट शेअर करत असते. कधी त्या पोस्ट सिनेमासंबंधी असतात तर कधी सोशल मीडियावरचे व्हायरल कोट्स, व्हिडीओ असतात.
advertisement
7/9
रिंकूनं नुकतीच एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. ज्यात असं लिहिलंय, "मला माझी झोप खूप आवडते आणि माझ्या झोपेलाही मी आवडते. पण माझ्या कुटुंबाला हे नातं आवडत नाही."
advertisement
8/9
रिंकूच्या कुटुंबाला तिचं न आवडणारं नात हे कोणत्याही व्यक्तीशी नाही तर तिच्या झोपेशी आहे. तिचं झोपेशी असलेल्या नात्याबद्दल तिचे कुटुंबीय आनंदी नाहीत असं रिंकूने ही पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
advertisement
9/9
रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सैराटनंतर आशा सिनेमा रिंकूची इमेज बदलेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. आशा सिनेमानंतर रिंकू राजगुरू पुन्हा साडे माडे 3 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 30 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'माझी फॅमिली या नात्यासाठी आनंदी नाही', त्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू