पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसह संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी पिंपरी गुरव येथील योगेश जांभुळकर यांनी केली आहे. नुकत्याच रशियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी दमदार यश मिळवलं आहे. 75 किलो वजन गटातील मास्टर कॅटेगरीमध्ये सहभागी होत योगेश जांभुळकर यांनी चार सुवर्णपदके आणि एक कान्स्य पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी 'लोकल 18'सोबत बातचीत केली आहे.
advertisement
योगेश जांभुळकर यांनी सांगितले की, रशियामध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातून सुमारे पाच हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. भारतातून 60 खेळाडू सहभागी झाले होते, तर महाराष्ट्रातून 11 खेळाडूंनी या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये योगेश जांभुळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला होता. या यशाच्या जोरावरच त्यांची रशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती.
या जागतिक स्पर्धेत त्यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत त्यांनी चार सुवर्ण आणि एक कान्स्य पदकांची कमाई केली आहे. योगेशने प्राप्त केलेल्या यशामागे त्याची कठोर मेहनत, नियमित सराव आणि शिस्तबद्ध आहार महत्त्वाचा ठरला आहे. सातत्याने केलेल्या परिश्रमाचे हे फळ असून त्यांच्या या कामगिरीमुळे पिंपरी- चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचं देशभरातून कौतुक केलं जात आहे.