पुण्यात पहिल्यांदाच घडलं! 'मफिन'ला मिळालं नवं आयुष्य, श्वानावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी Video

Last Updated:

यकृत आणि प्लीहामधील मोठ्या कर्करोगजन्य गाठींमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या 13 वर्षीय पाळीव कुत्र्यावर पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली.

+
शस्त्रक्रिया 

शस्त्रक्रिया 

पुणे : यकृत आणि प्लीहामधील मोठ्या कर्करोगजन्य गाठींमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या 13 वर्षीय पाळीव कुत्र्यावर पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे होणारा जीवघेणा रक्तस्राव टाळत या उपचारामुळे 2.5 किलो वजनाची गाठ कमी करण्यात यश आले असून कुत्र्याला नवे आयुष्य मिळाले आहे.
पुण्यातील सुमीत आणि आरू झोरे यांचा लाडका पाळीव कुत्रा मफिन झोरे (लॅब्राडोर, नर) गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होता. पोट फुगणे, चालताना अडचण, श्वास घेण्यास त्रास, तीव्र अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती. तपासणीत त्याचे हिमोग्लोबिन अवघे 3.5 mg/dl आणि प्लेटलेट्स केवळ 30 हजार इतके कमी असल्याचे आढळले. अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनमध्ये यकृत आणि प्लीहामध्ये 2.5 ते 3 किलो वजनाची मोठी गाठ दिसून आली, जी कॅन्सरची असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
advertisement
पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमने मफिनची प्रकृती लक्षात घेता प्रथम रक्त संक्रमण केले. मात्र त्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पारंपरिक शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक ठरली असती. याच पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय, व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी तज्ज्ञांनी एकत्र येत पहिल्यांदाच कुत्र्यावर कॅथलॅब एम्बोलायझेशन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
फेमोरल धमनीतून कॅथेटर टाकून गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांपर्यंत पोहोचण्यात आले आणि मायक्रो-कॅथेटर्सच्या सहाय्याने एम्बोलायझेशन करण्यात आले. या प्रक्रियेमुळे गाठीचा रक्तपुरवठा थांबला, अंतर्गत रक्तस्राव कमी झाला आणि गाठीचा आकार हळूहळू कमी होऊ लागला. अवघ्या 48 तासांत हिमोग्लोबिन पातळी वाढू लागली, तर पंधरा दिवसांत गाठ 70 टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाल्याचे आढळले.
advertisement
या यशस्वी प्रक्रियेत पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धर्मेश गांधी, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे, तसेच कॅथ लॅब टेक्निशियन कन्हैया खैरे आणि संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा होता. मफिन आता पुन्हा सक्रिय जीवन जगत असून मोकळा श्वास घेत आहे. या ऐतिहासिक यशामुळे पशुवैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पहिल्यांदाच घडलं! 'मफिन'ला मिळालं नवं आयुष्य, श्वानावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी Video
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement