जे बॉलिवूडला जमलं नाही, ते एकट्या रणवीर सिंहने करून दाखवलं! ठरला 'ही' कामगिरी करणारा एकमेव भारतीय

Last Updated:
Ranveer Singh: सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच नावाचा डंका वाजतोय, तो म्हणजे रणवीर सिंह आणि त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'.
1/9
मुंबई: सिनेसृष्टीत दर शुक्रवारी नशीब बदलतं असं म्हणतात, पण काही चित्रपट असे येतात जे नशीब नाही तर इतिहासच बदलून टाकतात. सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच नावाचा डंका वाजतोय, तो म्हणजे रणवीर सिंह आणि त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'.

advertisement
2/9
रणवीरच्या 'धुरंधर'ने शांतपणे पण तितक्याच ताकदीने असा काही पराक्रम केलाय की संपूर्ण सिनेसृष्टी थक्क झाली आहे. केवळ हिंदी या एकाच भाषेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून आता 'धुरंधर'ने अव्वल स्थान पटकावलं आहे.

3/9
गेल्या काही काळापासून साऊथच्या चित्रपटांनी बॉलिवूडला मागे टाकलं होतं, पण रणवीर सिंहने 'धुरंधर'च्या माध्यमातून बॉलिवूडचा तो जुना रुबाब पुन्हा मिळवून दिला आहे. एकाच भाषेत सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत या चित्रपटाने 'पुष्पा २' चे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

4/9
'धुरंधर'ची ही झेप केवळ सुरुवातीच्या काही दिवसांपुरती मर्यादित नव्हती. या चित्रपटाने चित्रपटगृहात जो जम बसवला, तो पाचव्या आठवड्यातही कायम आहे.

5/9
आपल्या प्रदर्शनाच्या ३३ व्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ८३१.४० कोटींची कमाई करून एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाने केवळ स्वभाषेतून एवढी अफाट कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

6/9
या यशाचं सर्वात मोठं श्रेय जातं ते म्हणजे रणवीर सिंहच्या काळजाला भिडणाऱ्या अभिनयाला. पडद्यावर रणवीरने ज्या पद्धतीने आपलं पात्र जिवंत केलंय, ते पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.

7/9
त्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, त्याचा स्क्रीन प्रेझेंस आणि संवादफेकीतील अचूकता यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला भिडला. केवळ सुपरस्टार म्हणूनच नाही, तर एक कसलेला कलाकार म्हणून रणवीरने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे.

8/9
ट्रेड विश्लेषकांच्या मते, 'धुरंधर' इतके दिवस टिकून राहण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची जबरदस्त पटकथा. अनेक प्रेक्षक हा चित्रपट अनुभवण्यासाठी दोन-तीनदा थिएटरमध्ये जात आहेत.

9/9
रणवीर सिंहच्या करिअरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला असून, हिंदी सिनेमाच्या इतिहासात ही गोष्ट कायम लक्षात ठेवली जाईल.

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement