अर्ज बाद झालेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई कोर्टातून मोठी अपडेट, पुन्हा संधी मिळणार?
- Reported by:PRASHANT BAG
- Published by:Sachin S
Last Updated:
महापालिका निवडणुकीत अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधातील याचिका न्यायालयाने स्विकारली आहे.
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. कोरोना काळानंतर निवडणूक होत असल्यामुळे अनेक इच्छुक यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण, काही उमेदवारांचे अर्ज हे बाद करण्यात आले होते. आता त्या बाद उमेदवारांना दिलासा मिळणार अशी चिन्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांच्या जनहित याचिकेवर सुनावणी निश्चित केली आहे. उद्या शुक्रवारीच ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहे.
महापालिका निवडणुकीत अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधातील याचिका न्यायालयाने स्विकारली आहे. उद्या शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. किरकोळ आणि तांत्रिक कारणांचा आधार घेऊन विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मनमानीपणे फेटाळल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. अधिकाऱ्यांची ही कृती असंवैधानिक आणि अरेरावीची असून, यामुळे अनेक इच्छुकांना निवडणूक लढवण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
advertisement
तसंच, महापालिका प्रशासनाचा हा पवित्रा राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारा असल्याची याचिकेत टीका केली आहे. महापालिका प्रशासनाकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 12 डिसेंबर 2025 च्या अधिसूचनेतील अटींमध्ये बदल करून महानगरपालिका प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.
महापालिका ही केवळ अंमलबजावणी करणारी संस्था असतानाही तिने आयोगाचे विशेष अधिकार डावलून उमेदवारीसाठी स्वतःच्या अटी लादल्या. आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीचे उल्लंघन केल्याचा याचिकेत दावा केला आहे.
advertisement
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना मिळणार दिलासा
view commentsआता पुढील आठवड्यात मुंबई महापालिका निवडणूक होत आहे. यामध्ये अर्ज फेटाळल्या गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आता उच्च न्यायालयाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे बाद ठरवण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांबद्दल न्यायालय काय निर्णय देते, हे पाहण्याचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 7:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई कोर्टातून मोठी अपडेट, पुन्हा संधी मिळणार?











