दीड रुपयांच्या शेअरने बाजारात खळबळ उडवली; पैसा दुप्पट नाही थेट कोटींमध्ये, गुंतवणूकदारांचे आयुष्य बदलून टाकलं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Multibagger Stock: शेअर बाजारात क्वचितच दिसणारा मल्टीबॅगर परफॉर्मन्स समोर आला असून एका स्मॉलकॅप शेअरने गुंतवणूकदारांना अक्षरशः कोट्यधीश केले आहे. अवघ्या 15 महिन्यांत 1 रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर हजारो रुपयांवर पोहोचल्याने बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई: शेअर बाजारात मल्टीबॅगर शेअर्सची यादी मोठी आहे. काही शेअर्स वर्षानुवर्षे संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करतात, तर काही शेअर्स अवघ्या काही महिन्यांतच आयुष्य बदलून टाकतात. असाच एक धक्कादायक परफॉर्मर म्हणजे श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा शेअर होय.
advertisement
या शेअरने केवळ 15 महिन्यांत तब्बल 1.36 लाख टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं, तर हा शेअर गुंतवणूकदारांसाठी पैसा छापणारी मशीन ठरला आहे.
advertisement
15 महिन्यांत 1 लाखाचे 13 कोटी
11 सप्टेंबर 2023 रोजी श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर फक्त 1.30 रुपयांवर होता. बुधवारी हा शेअर 1,770 रुपयांवर बंद झाला. या काळात शेअरमध्ये झालेली झपाट्याने वाढ थक्क करणारी आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे 1,36,053% मल्टीबॅगर रिटर्न मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सप्टेंबर 2023 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत होल्ड केले असते, तर त्याची गुंतवणूक आज 1 कोटी नाही, तर तब्बल 13 कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
advertisement
5 वर्षांचा प्रवास: शांततेतून रॉकेट वेगाकडे
या शेअरचा दीर्घकालीन प्रवासही तितकाच रोचक आहे. 4 जानेवारी 2021 रोजी या शेअरचा भाव 1.90 रुपये होता. पुढील काही वर्षे तो अत्यंत संथ गतीने वाढत जानेवारी 2025 च्या सुरुवातीला 3 रुपयांपर्यंत पोहोचला.
advertisement
मात्र 2024 मध्ये चित्र पूर्णपणे बदललं. 29 नोव्हेंबर 2024 रोजी शेअरने 1,932 रुपयांचा उच्चांक गाठला. त्यानंतर थोडी घसरण झाली, पण तरीही शेअर मजबूत पातळीवर टिकून आहे. गुरुवारी तो 4.79% वाढीसह 1,854 रुपयांवर बंद झाला. एकूण पाहता गेल्या 5 वर्षांत या शेअरने सुमारे 89,636% रिटर्न दिला आहे.
advertisement
नेमकं करते तरी काय ही कंपनी?
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडची स्थापना 1994 मध्ये झाली. ही कंपनी मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात कार्यरत असून, विविध ब्रॉडकास्टर्स, कंटेंट एग्रीगेटर्स आणि सॅटेलाइट नेटवर्क्ससाठी कंटेंट प्रोडक्शनसह संबंधित सेवा पुरवते. ही एक स्मॉलकॅप कंपनी असून सध्या तिचं मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे 4,330 कोटी रुपये आहे. कमी किमतीतून थेट हजारो रुपयांपर्यंत पोहोचलेला हा शेअर सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 6:48 PM IST
मराठी बातम्या/मनी/
दीड रुपयांच्या शेअरने बाजारात खळबळ उडवली; पैसा दुप्पट नाही थेट कोटींमध्ये, गुंतवणूकदारांचे आयुष्य बदलून टाकलं








