TRENDING:

पुण्यात 9 जणांकडून 31 वर्षीय तरुणाचं अपहरण; निर्जन मैदानात नेऊन विवस्त्र केलं अन्.., धक्कादायक कृत्य

Last Updated:

जुन्या आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून आरोपींनी पीडिताचे कारमधून अपहरण केले. एका निर्जन मैदानात नेऊन आरोपींनी तरुणाला विवस्त्र केले आणि..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचे संतापजनक उदाहरण कात्रज-कोंढवा रस्त्यावर समोर आले आहे. केवळ आर्थिक वादातून एका ३१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला विवस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडिताचा व्हिडिओ बनवून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
31 वर्षीय तरुणाचं अपहरण (AI Image)
31 वर्षीय तरुणाचं अपहरण (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाला ३१ डिसेंबरच्या रात्री नऊ जणांनी गाठले. जुन्या आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून आरोपींनी पीडिताचे कारमधून अपहरण केले. गोकुळनगर परिसरातील एका निर्जन मैदानात नेऊन आरोपींनी तरुणाला विवस्त्र केले आणि त्याला बेदम मारहाण केली. या अघोरी कृत्याचे त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करून, पोलिसात गेल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

advertisement

दहशत माजवण्यासाठी आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून पीडिताला धमकावले आणि गोळीबारही केला. सुदैवाने, या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या तरुणाने रविवारी येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक खराडे पसार आरोपींचा शोध घेत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअरिंगची नोकरी सोडली, आता उभारला कॅफे, ओंकारच्या यशाची कहाणी Video
सर्व पहा

पुणे शहरात गेल्या काही काळापासून किरकोळ वादातून होणारे खून आणि प्राणघातक हल्ल्यांचे सत्र वाढले आहे. आकडेवारीनुसार, मागील वर्षात ७९ खून आणि १५३ खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. गुन्ह्यांच्या प्रमाणात तांत्रिकदृष्ट्या घट दिसत असली, तरी भररस्त्यात होणारे हल्ले आणि वाहनांची तोडफोड यामुळे सर्वसामान्य पुणेकर मात्र प्रचंड दहशतीखाली आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 9 जणांकडून 31 वर्षीय तरुणाचं अपहरण; निर्जन मैदानात नेऊन विवस्त्र केलं अन्.., धक्कादायक कृत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल