Success Story : व्यवसाय करण्यासाठी इंजिनिअरिंगची नोकरी सोडली, आता उभारला कॅफे, ओंकारच्या यशाची कहाणी Video
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नाशिकच्या एका उच्चशिक्षित संगणक अभियंत्याने नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला. आज हा तरुण एक यशस्वी उद्योजक म्हणून नाशिकमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे.
नाशिक: कोरोना काळानंतर जगभरातील नोकरीच्या बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली. आज असलेली नोकरी उद्या असेलच याची खात्री नाही ही भीती अनेक तरुणांच्या मनात घर करून बसली होती. याच भीतीचे रूपांतर संधीत करून नाशिकच्या एका उच्चशिक्षित संगणक अभियंत्याने नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला. आज हा तरुण एक यशस्वी उद्योजक म्हणून नाशिकमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे.
मुंबईतील नोकरी अन् मनातील द्वंद्व
ओंकार पिंगळे याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरची सुरुवात मुंबईसारख्या शहरात केली. काही वर्षे त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात अनुभव घेतला, मात्र तिथे काम करताना त्याला सतत एक गोष्ट जाणवत होती आपण आपला अमूल्य वेळ दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी खर्च करत आहोत, पण त्या बदल्यात मिळणारा मोबदला आणि समाधान मात्र अपुरे आहे.
advertisement
कोरोना काळातील अनुभव आणि मोठा निर्णय
कोरोनाच्या संकटकाळात अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली. हे पाहून ओंकारच्या मनात विचार आला की, जर भविष्यात नोकरीवरच संकट आले तर काय करायचे? सुरक्षिततेचा हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारण्याचा ठाम निर्णय त्याने घेतला आणि तो पुन्हा आपल्या नाशिकमध्ये परतला.
advertisement
नेक्टर्स कोल्डड्रिंक कॅफेचा जन्म
नाशिकमध्ये परतल्यानंतर ओंकारने नेक्टर्स (Nectars) या नावाने आपला कोल्डड्रिंक कॅफे सुरू केला. सुरुवातीला आव्हाने होती, पण आपल्या कष्टाच्या जोरावर त्याने हा व्यवसाय अल्पावधीतच नावारूपाला आणला. आज ओंकार या व्यवसायातून नोकरीच्या पगारापेक्षा कितीतरी पट अधिक उत्पन्न मिळवत आहे. आज माझ्याकडे नोकरी जाण्याचे कोणतेही टेन्शन नाही, उलट मी इतरांना रोजगार देऊ शकतो याचा मला अभिमान वाटतो, असे ओंकार अभिमानाने सांगतो.
advertisement
शिक्षण जरूर घ्या, पण आपले शिक्षण आणि आपला वेळ इतरांसाठी वाया घालवण्यापेक्षा त्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करा. शक्य असेल तर व्यवसायात उतरा, कारण स्वतःचा मालक असण्यासारखं दुसरं सुख नाही, असं ओंकार सांगतो.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 4:05 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : व्यवसाय करण्यासाठी इंजिनिअरिंगची नोकरी सोडली, आता उभारला कॅफे, ओंकारच्या यशाची कहाणी Video








