Snake Myth : सापाने शेपटीने मारलं तर माणसाचा मृत्यू होतो का? काय आहे यामागचं सत्य, अनेकांना हे माहित नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी असं ऐकलंय का की सापाने शेपटीने मारलं तरी माणूस मरतो किंवा त्याला गंभीर आजार होतो? अनेकांच्या मनात हा प्रश्न घर करून असतो की, सापाच्या शेपटीतही विष असतं का?
आपल्या समाजात सापाबद्दल जितकी भीती आहे, तितकेच गैरसमजही आहेत. ग्रामीण भागात आजही सापाशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात. सापाने फणा काढून दंश केला की विष पसरतं आणि मृत्यू ओढवू शकतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण, तुम्ही कधी असं ऐकलंय का की सापाने शेपटीने मारलं तरी माणूस मरतो किंवा त्याला गंभीर आजार होतो? अनेकांच्या मनात हा प्रश्न घर करून असतो की, सापाच्या शेपटीतही विष असतं का? आजच्या या लेखात आपण सापाच्या शेपटीबाबत पसरलेल्या अफवा आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
सापाची शेपटी आणि मृत्यू: काय आहे सत्य?अनेकदा सापाचा सामना झाला असता, साप स्वतःच्या संरक्षणासाठी आपली शेपटी जोरात आपटतो. जर ही शेपटी चुकून एखाद्या माणसाला लागली, तर तिथे जखम किंवा ओरखडा येऊ शकतो. मात्र, सापाच्या शेपटीत कोणतेही विष नसते. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध सर्पमित्र महादेव पटेल यांनी स्पष्ट केल्यानुसार, सापाने शेपटीने मारल्यामुळे माणूस कधीही बेशुद्ध होत नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही. साप केवळ शत्रूला घाबरवण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी शेपटीचा वापर करतो.
advertisement
मग शेपटी लागल्यावर ताप का येतो?काही लोक दावा करतात की सापाची शेपटी लागल्यामुळे त्यांना ताप आला किंवा डोकेदुखी सुरू झाली. यामागे दोन मुख्य कारणे असू शकतात.1. बॅक्टेरियल इन्फेक्शन: सापाची शेपटी लागल्यामुळे त्वचेवर जखम झाली असेल आणि ती अस्वच्छ असेल, तर तिथे संसर्ग (Infection) होऊ शकतो. या इन्फेक्शनमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि परिणामी ताप येऊ शकतो. हा ताप सापाच्या विषाचा नसून बॅक्टेरियाचा असतो.2. मानसिक भीती (Psychological Impact): साप हा प्राण्यांमधील सर्वात भीतीदायक जीव मानला जातो. सापाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क आला की माणसाची भीती शिगेला पोहोचते. या प्रचंड तणावामुळे शरीरात 'ॲड्रेनालाईन' हार्मोन वाढते, ज्यामुळे भीतीपोटी डोकेदुखी, घाम येणे किंवा ताप जाणवू शकतो.
advertisement
advertisement
advertisement









