Success Story : कौटुंबिक जबाबदारी असताना घेतला निर्णय, महिलेने उभारला मशरूमचा प्लांट, वर्षाला 5 लाखांची कमाई
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कौटुंबिक जबाबदारी असताना देखील विद्या उजेड यांनी ऑईस्टर मशरूमचा प्लांट उभा केला आहे. या माध्यमातून वार्षिक पाच लाखांची कमाई त्या करतात.
जालना : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कामाप्रती समर्पण असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले जालन्यातील अंतरवाला येथील एका महिलेने. कौटुंबिक जबाबदारी असताना देखील विद्या उजेड यांनी ऑईस्टर मशरूमचा प्लांट उभा केला आहे. या माध्यमातून वार्षिक पाच लाखांची कमाई त्या करतात. पाहूयात कशी केली जाते मशरूमची शेती.
विद्या उजेड यांनी 2015 मध्ये खरपुडी येथे कृषी विज्ञान केंद्रात मशरूम निर्मितीचे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये पहिल्यांदा मशरूम घरीच तयार करून पाहिलं. प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचे नियोजन केलं. 2019 मध्येच आपल्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड तयार केलं. या शेडमध्ये शेतामध्ये उपलब्ध असलेल्या धान्याच्या भुशापासून पाच किलोच्या पन्नीमध्ये बेड तयार केले. या बेडमध्ये निर्जंतुकीकरण केलेले भुसा, त्यावरती मशरूम बीज अशा पद्धतीने चार लेयर तयार करून हे बेड तरंगते लटकवून ठेवले जातात.
advertisement
22 दिवसांनी बीजांना कोंब येतो तर 25 दिवसाला मशरूमचे हार्वेस्टिंग करता येते. त्यांच्याकडे सध्या 30 बेड असून दिवसाला पाच ते सहा किलो फ्रेश मशरूम त्या तयार करतात. तीन ते चार वेळा हार्वेस्टिंग झाल्यानंतर रिकामी झालेल्या भुशाचा बेड हा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो.
advertisement
या मशरूमला बाजारामध्ये 400 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. ड्राय मशरूमला 600 ते 1000 रुपये प्रति किलो तर मशरूम पावडरला दोन हजार रुपये प्रति किलो असा दर आहे. आतापर्यंत मी इथं 180 व्यावसायिकांना मशरूम निर्मितीचे प्रशिक्षण दिलं आहे तर तब्बल 45 मशरूम निर्मितीचे प्लांट आतापर्यंत उभे झाले आहेत, असं विद्या उजेड यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : कौटुंबिक जबाबदारी असताना घेतला निर्णय, महिलेने उभारला मशरूमचा प्लांट, वर्षाला 5 लाखांची कमाई










