Shower After Workout : हिवाळ्यात जिम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम? 99% लोकांना असतो गैरसमज

Last Updated:
Hot or cold shower after workout : तुम्ही हिवाळ्यात जिमनंतर अंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. जिमनंतर योग्य पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला अधिक फायदा होतो. बहुतांश लोकांना कोमट किंवा हलकं गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते, तर काही लोक थंड पाण्याने आंघोळ करतात. परंतु हिवाळ्यात जिमनंतर कोणत्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरतं जाणून घ्या.
1/7
हिवाळ्यात फिटनेस टिकवण्यासाठी अनेक जण नियमितपणे जिमला जातात. मात्र जिममधील कसरत संपल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, तो म्हणजे अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड? चुकीची सवय शरीरावर विपरीत परिणाम करू शकते. त्यामुळे हिवाळ्यात जिमनंतर अंघोळ कोणत्या पाण्याने केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते हे तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

advertisement
2/7
जिमनंतर शरीरात काय बदल होतात : व्यायाम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढते, घाम येतो आणि स्नायूंवर ताण पडतो. त्यामुळे जिमनंतर शरीराला योग्य प्रकारे थंड करणे आणि स्नायूंना आराम देणे महत्त्वाचे असते. अंघोळ या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे कोणत्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊया.

3/7
गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे : हिवाळ्यात जिमनंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू सैल होतात आणि कडकपणा कमी होतो. स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि थंड हवामानामुळे होणारी अंगदुखी कमी होते. व्यायामानंतर शरीर खूप थकलं असेल तर गरम पाणी शरीराला आराम देण्याचं काम करतं.

4/7
थंड पाण्याने अंघोळ कधी उपयुक्त : खूप जास्त घाम आला असेल किंवा शरीर फार गरम झालं असेल, तर थंड पाण्याने अंघोळ केल्यास सूज आणि स्नायूंमधील जळजळ कमी होते. थंड पाणी शरीराला फ्रेश वाटण्यास मदत करतं. मात्र हिवाळ्यात अचानक थंड पाणी अंगावर घेतल्यास सर्दी, खोकला किंवा अंगावर काटा येण्याची शक्यता वाढते.

5/7
कोमट पाणी का ठरते सर्वोत्तम पर्याय : बहुतेक तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात जिमनंतर कोमट पाण्याने अंघोळ करणे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. कोमट पाणी स्नायूंना आराम देते, शरीराचं तापमान हळूहळू संतुलित करतं आणि आजारांचा धोका कमी करतं. ना फार गरम ना फार थंड असल्यामुळे शरीरावर कोणताही अचानक ताण येत नाही.

6/7
कोणती काळजी घ्यावी : जिम झाल्यानंतर लगेच अती थंड पाण्याने अंघोळ टाळावी. आधी शरीर थोडं स्थिर होऊ द्यावं. आजारी असाल सर्दी-खोकला असेल किंवा रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास असेल तर थंड पाण्याणे आंघोळ करणं टाळणंच योग्य.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement