Government Job : परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी! 1.4 लाख पगाराची संधी; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
Last Updated:
Government Jobs: नालको कंपनीत 110 इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गेट 2025 स्कोअरवर निवड होणार असून पगार 1.4 लाखांपर्यंत आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच NALCO मध्ये इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नालको ही भारत सरकारची नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून अॅल्युमिनियम उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे.
परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवा
नालकोकडून ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी पदासाठी एकूण 110 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी 59, इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी 27 तर केमिकल इंजिनियरसाठी 24 जागा उपलब्ध आहेत. इंजिनियरिंग केलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
या भरतीसाठी अर्जप्रक्रिया 2 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 22 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी nalcoindia.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,00 रुपये मासिक पगार मिळणार आहे. याशिवाय सरकारी कंपनीतील इतर भत्ते आणि सुविधा देखील मिळणार आहेत.
advertisement
विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड GATE 2025 च्या स्कोअरवर आधारित असेल. GATE स्कोअरच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून फुल टाइम मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल इंजिनियरिंगची पदवी,एमटेक असणे आवश्यक आहे. तसेच GATE-2025 चे वैध स्कोअरकार्ड असणे बंधनकारक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 2:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Government Job : परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी! 1.4 लाख पगाराची संधी; अर्ज कुठे आणि कसा करायचा?










