Shocking! गुडघ्याची सर्जरी आणि मुलाची भाषाच बदलली! हे झालं कसं? कुटुंबासह डॉक्टरही धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Surgery News : सामान्यपणे सर्जरीचा परिणाम त्या भागावर होतो, पण एका मुलाच्या बाबतीत मात्र काही विचित्रच घडलं. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आणि त्याची भाषाच बदलली.
advertisement
1/7

सर्जरी किंवा शस्त्रक्रियेनंतर काही परिणाम होतात. जसं की पायाची शस्त्रक्रिया झाली तर त्याच परिणाम पायावर दिसून येईल, हाताची सर्जरी झाली तर त्याचा परिणाम हातावर दिसून येईल. म्हणजे विशिष्ट अवयवावरील ऑपरेशनचा परिणाम त्या भागावरच दिसून येईल. पण एका मुलाच्या बाबतीत मात्र काही विचित्रच घडलं. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आणि त्याची भाषाच बदलली. (प्रतीकात्मक फोटो - AI Generated)
advertisement
2/7
नेदरलँडमधील हा 17 वर्षांचा मुलगा. फुटबॉल खेळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला इतकं लागलं होती की त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाच करावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कोणतीही गुंतागुंत नव्हती. जसं त्याला दिलेलं भुलीच्या इंजेक्शनचा परिणाम कमी झाला आणि मुलगा शुद्धीवर आला, त्याने तोंड उघडलं तसे डॉक्टर, नर्स आणि कुटुंब सगळे स्तब्ध झाले. फक्त डच बोलणारा हा मुलगा फक्त इंग्रजी बोलत होता. त्याची मातृभाषा डच तो पूर्णपणे विसरला. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/7
सुरुवातीला नर्सना वाटलं की हा पोस्ट-अनेस्थेसिया डेलिरियम म्हणजे गुंगीतून शुद्धीत येताना झालेला गोंधळ असावा. पण बराच वेळ तो मुलगा डच बोललाच नाही. इतकंच नव्हे तर तो त्याच्या पालकांनाही ओळखत नव्हता. तो वारंवार आपण अमेरिकेतील युटाला राहत असल्याचं सांगत होता. या घटनेने सर्वांना धक्का बसला. या मुलाला नेमकं काय झालं? असा प्रश्न पडला. तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांना बोलावलं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/7
तपासणीत असं दिसून आलं की तो मुलगा आरामात होता, डोळ्यांशी संपर्क साधत होता, फक्त प्रश्नांची उत्तरं इंग्रजीत देत होता, ज्यात डच उच्चार होते. न्यूरोलॉजिकल चाचण्यांमध्ये कोणतीही असामान्यता आढळली नाही. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
5/7
डॉक्टरांनी याला फॉरेन लँग्वेज सिंड्रोम (FLS) म्हटलं आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये रुग्ण अचानक त्याच्या मूळ भाषेतून दुसऱ्या भाषेत जातो जी तो दररोज वापरत नाही. वैद्यकीय क्षेत्रात अशा फक्त नऊ प्रकरणांची नोंद झाली आहे आणि किशोरवयीन मुलाशी संबंधित ही पहिलीच घटना आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
6/7
बहुतेक प्रकरणं भूल, शस्त्रक्रिया किंवा न्यूरोलॉजिकल घटनांनंतर उद्भवतात. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की भूल देणारी औषधे मेंदूच्या भाषा केंद्रांवर (ब्रोकाचा क्षेत्र, वेर्निकचा क्षेत्र) तात्पुरता परिणाम करू शकतात, ज्यामुळे मूळ भाषा बोलता येत नाही आणि दुसरी भाषा तोंडातून निघते. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
7/7
तो त्या जागेबद्दल गोंधळलेला होता आणि त्याला वाटलं की तो अमेरिकेत आहे. 18 तासांनंतर मुलाला डच समजू लागलं, पण बोलता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे मित्र आले, तेव्हा तो अचानक डच बोलू लागला, जणू काही झालंच नाही. तीन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. फॉलो-अपमध्ये तो आता पूर्णपणे सामान्य असल्याचं दिसून आलं आहे. (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Shocking! गुडघ्याची सर्जरी आणि मुलाची भाषाच बदलली! हे झालं कसं? कुटुंबासह डॉक्टरही धक्क्यात