TRENDING:

कॉलेजमध्ये असताना तिकीट मिळालं, महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण उमेदवार पुणे पालिकेच्या रिंगणात

Last Updated:

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक ३६ (क) गटातून सर्वसाधरण महिला उमेदवार म्हणून सई थोपटे हिला उमेदवारी दिली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
सई थोपटे
सई थोपटे
advertisement

पुणे :  राज्यात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला आहे. सत्ताधारी गटात  मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वच मंत्री प्रचाराला लागले आहे. तर विरोधकही आपल्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा सुरू करण्याचा धडाका सुरू केला आहे. पण, पुणे महापालिका निवडणुकीत एका उमेदवाराचं नाव आणि वय दोन्ही चर्चेत आलं आहे. भाजपच्या उमेदवार अवघ्या २२ वर्षांची सई प्रशांत थोपटे नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत आहे. शिक्षण सुरू असलेली सई ही सध्या महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण उमेदवारांपैकी एक आहे.

advertisement

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक ३६ (क) गटातून सर्वसाधरण महिला उमेदवार म्हणून सई थोपटे हिला उमेदवारी दिली आहे. सई सध्या उच्च शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना तिला भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे, कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना सई थोपटे हिला भाजपने उमेदवारी दिल्याची बातमी कळाली होती. उमेदवारी जाहीर होताच सई आणि तिच्या मित्रांनी एकच जल्लोष केला.

advertisement

सई थोपटे ही राजकारणात नवखी असली तरी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुण्यात वेगवेगळे विषय, कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये तिने सहभाग नोंदवला होता. कॉलेजमध्येही तिने तरुणांच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि ठाम भूमिका मांडली. तिची हीच कामाची तळमळ पाहून भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली.

advertisement

भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याची मुलगी 

सई थोपटे हिच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झालं तर तिचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी  उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात.  पर्वती, सहकारनगर, धनकवडी परिसरात भाजप पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशांत थोपटे यांनी केलंय. पर्वतीच्याा आमदार  माधुरी मिसाळ यांनी थोपटे कुटुंबीयांची भाजपशी असलेला संबंध आणि एकनिष्ठात पाहून  सई थोपटे हिला पुणे महानगरपालिकेसाठी तिकीट दिलं, असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

सगळ्यात तरुण नगरसेवक होणार का? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेल सारखी चिकन तंदुरी, आता सोप्या पद्धतीने बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

सई थोपटे ही वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी महापालिकेची निवडणूक लढत आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेतात घेता ती प्रचाराला लागली आहे. त्यामुळे आता या तरुण उमेदवाराला पुणेकर पसंती देऊन नगरसेवक करतात का, हे पाहण्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
कॉलेजमध्ये असताना तिकीट मिळालं, महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण उमेदवार पुणे पालिकेच्या रिंगणात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल