Chicken Tandoori Recipe : हॉटेल सारखी चिकन तंदुरी, आता सोप्या पद्धतीने बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज आपण तंदूर नसतानाही घरीच तव्यावर चिकन तंदुरी कशी बनवायची, साहित्य आणि कृती बघुयात.
कल्याण : तंदुरी चिकन म्हटलं की डोळ्यांसमोर हॉटेलमधला लालसर आणि स्मोकी चव असलेला चिकनचा तुकडा उभा राहतो. अनेकांना वाटतं की तंदुरी चिकन बनवण्यासाठी खास तंदूरच लागतो, पण प्रत्यक्षात तसे नाही. योग्य मसाले, योग्य मॅरिनेशन आणि थोडीशी स्मार्ट पद्धत वापरली तर तंदूरशिवायही घरच्या रेसिपीमध्ये आपण हेल्दी आणि चविष्ट असा पर्याय सहज तयार करून अगदी हॉटेलसारखं तंदुरी चिकन तयार करू शकतो. आज आपण तंदूर नसतानाही घरीच तव्यावर चिकन तंदुरी कशी बनवायची, साहित्य आणि कृती बघुयात.
चिकन तंदुरी साहित्य:
चिकन (बोनलेस किंवा हाडांसहित किंवा चिकन मंदी), दही, आलं-लसूण पेस्ट, आगरी मसाला, लाल तिखट (काश्मिरी तिखट), हळद
धणे-जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ, तेल किंवा बटर हे साहित्य लागेल.
चिकन तंदुरी कृती:
चिकन तयार करणे: चिकन स्वच्छ धुवून घ्या. सुरीने चिकनच्या तुकड्यांना खोलवर चिरा मारा, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल आणि चिकन मऊ होईल.
advertisement
मॅरिनेशन (मसाला लावणे): एका मोठ्या भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि थोडे तेल/बटर घालून चांगले मिक्स करा. या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून मसाल्याचा लेप व्यवस्थित लावा.
मुरवणे: चिकन कमीतकमी 10 मिनिटे, किंवा अधिक चांगल्या चवीसाठी फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवा.
शिजवणे: तवा गरम करून त्यावर थोडे बटर/तेल लावा आणि चिकनचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी शिजेपर्यंत भाजून घ्या.
advertisement
सर्व्ह करणे: गरमागरम तंदुरी चिकन पुदिना चटणी आणि लिंबाची फोड देऊन नान किंवा भातासोबत सर्व्ह करा.
आरोग्य आणि फायदे:
प्रोटीनचा चांगला स्रोत असून स्नायूंच्या वाढीसाठी मदत करते. कमी तेल वापरल्यास आणि बाहेरून आणताना रंग तपासल्यास ते आरोग्यदायी पर्याय आहे. मसाल्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असू शकतात.
टीप: तंदुरी चिकन बनवताना भरपूर मसाले आणि कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे चव आणि आरोग्य दोन्ही साधता येईल.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 3:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chicken Tandoori Recipe : हॉटेल सारखी चिकन तंदुरी, आता सोप्या पद्धतीने बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video









