Raj Thackeray : जय-वीरूची जोडी फुटली, पहिल्या सभेआधीच राज ठाकरेंना शॉक, कट्टर मनसैनिक भाजपमध्ये!
- Reported by:PRANALI KAPASE
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मनसेमधली जय-वीरू म्हणून ओळखली जाणारी जोडी फुटली आहे.
advertisement
1/6

राज ठाकरे यांचे कट्टर मनसैनिक संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. संतोष धुरी यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या पुढाकाराने ही भेट झाली आहे.
advertisement
2/6
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची जोडी मनसेमध्ये जय-वीरूची जोडी म्हणून ओळखली जायची, पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडलं आहे.
advertisement
3/6
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती झाली आणि संतोष धुरी यांचा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे गेला, तेव्हापासून संतोष धुरी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तसंच संतोष धुरी नॉट रिचेबल झाल्याचंही बोललं गेलं.
advertisement
4/6
वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 वरून मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यात वाद झाला, अखेर 192 मनसेला तर 194 शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आला. यातला 194 क्रमांकाचा वॉर्ड हा संतोष धुरींचा होता.
advertisement
5/6
मनसे नेते संतोष धुरी यांना जागा न मिळाल्यामुळे जीव तुटल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली होती. 'संतोष धुरी माझा सहकारी आहे, तो माझ्यासोबत सगळ्या आंदोलनामध्ये होता. अनिशा माजगावकरही माझी सहकारी आहे. शिवडीमधले इच्छुकही माझे सहकारी होते', असं देशपांडे म्हणाले.
advertisement
6/6
मनसेसाठी तडीपारी भोगल्यात, जेलवारी केली आहे, खस्ता खाल्ल्यात त्या सगळ्या मनसैनिकांना यावेळी तिकीट मिळायला पाहिजे, ही माझी भूमिका होती. माझ्या सहकाऱ्यांसाठी माझा जीव तुटणं स्वाभाविक आहे. कोणत्याही युतीमध्ये माणूस 100 टक्के समाधानी होऊ शकत नाही, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Raj Thackeray : जय-वीरूची जोडी फुटली, पहिल्या सभेआधीच राज ठाकरेंना शॉक, कट्टर मनसैनिक भाजपमध्ये!