मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अशातच देवनार परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दोन संशयास्पद व्हॅन आढळल्या. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जेव्हा ही व्हॅन थांबवली आणि तपासणी केली असता २ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड सापडली.
रोकड कुणाची?
advertisement
मुंबईत एकीकडे निवडणुकीचं वातावरण असताना व्हॅनमध्ये इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून व्हॅन चालकाकडे चौकशी करण्यात येत आहे. देवनार परिसरात सापडलेल्या या २ व्हॅनमध्ये असलेली रोख रक्कम ही निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी तपासली. ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेण्यात येत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली. दोन्ही व्हॅन चालकांनी तसा दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून या दाव्याचा चौकशी केली जात आहे. ही रक्कम सध्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. ही रक्कम कुठून आणि कुणाकडे नेण्यात येत होती, याचा तपास केला जात आहे.
