जिलेबी म्हणजे गोड, मग तिखट जिलेबी हे ऐकूनच थोडं विचित्र वाटलं असेल. तिखट जिलेबी कशी लागत असेल. पण एकदा का तुम्ही ही तिखट जिलेबी खाल्ली की तुमचं मन तृप्त झाल्यासारखं होईल. तिखट जिलेबी ज्याला घणुळे किंवा शेंगुळे असंही म्हणतात. विदर्भातील हा पदार्थ आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना हा परिचयाचा असेल. पण इतरांसाठी मात्र नवा. चला तर मग पाहुयात तिखट जिलेबी बनवायची कशी.
advertisement
Fish Recipe Video : काट्यांच्या माशांची भजी, पण काटे कसे काढायचे? सोपी ट्रिक
तिखट जिलेबीसाठी साहित्य
गव्हाचं पीठ : दीड ग्लास
हळद
तिखट
काळा मसाला किंवा गरम मसाला
मीठ
आलं लसूण पेस्ट
कोथिंबीर
तेल
मोहरी
जिरं
कडीपत्ता
कांदा
पाणी
तिखट जिलेबीची कृती
अर्धा चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घाला. हाताने मिक्स करून घ्या. थोडंथोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या. पोळ्यांसाठी पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट मळा. 10 मिनिटं बाजूला ठेवा.
गॅसवर भांडं ठेवा, त्यात 3 चमचे तेल. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, कढीपत्ता, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत परतून घ्या. आता यात एक चमचा आलं-लसूण पेस्ट टाकून तेलात चांगली परतून घ्या. पाव चमचा हळद, दोन चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मसाले तेलात चांगले परतून घ्या. फोडणीत मसाले घालताना गॅसची फ्लेम कमी करा नाहीतर मसाले करपतील. आता 3 ग्लास पाणी घाला. तुम्हाला रस्सा हवा तसं पाणी घाला. पाण्याला उकळी येऊ द्या.
Shevaga Ladu : शेवग्याची पानं, शेंगांची भाजी तर नेहमीच खाता; आता एकदा शेवग्याचा लाडू बनवून पाहा
आता जे पीठ मळलं होतं, त्याला तेल लावून मळून घ्या. पिठाचा छोटा गोळा घ्या आणि तो कापसाच्या वातीसारखा लांब वळा. वळताना तुम्ही हाताला पीठ किंवा तेल लावू शकता. याला जिलेबीसारखा आकार द्यायचा आहे.
शेवटी थोडंसं पीठ ठेवायचं हे पीठ पाण्यात मिक्स करून हे पाणी फोडणीला जे पाणी घातलं आहे, त्यात ओता. यामुळे रश्शाला दाटसरपणा येईल. चांगली उकळी आली की यात पिठाची बनवलेली जिलेबी सोडायची आहे. भांड्यावर झाकण ठेवा. पूर्ण झाकण लावू नका. मध्यम आचेवर 10 ते 12 शिजवून घ्या. रस्सा एकदम पातळ आणि एकदम घट्टही नसावा. आता यात एक चमचा काळा मसाला टाका. गॅसची फ्लेम मंद करून नीट मिक्स करून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एक मिनिटभर शिजू द्या. खाताना यावर लिंबू पिळून खा.
Aaich Kitchen युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत कोथिंबीर, आलं-लसूण याचं प्रमाण जास्त ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार हा पदार्थ विदर्भात गोकुळाष्टमीला आवर्जून केला जातो. आता तुम्ही एकदा ट्राय करून पाहा आणि तिखट जिलेबी कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
