Fish Recipe Video : काट्यांच्या माशांची भजी, पण काटे कसे काढायचे? सोपी ट्रिक

Last Updated:

Fish Pakora Recipe Video : कोलंबीसारख्या माशांची भजी तुम्ही बनवली असेल, खाल्ली असेल, पण काट्याच्या माशांची भजी बनवण्याचा विचारही कुणी कधी केला नसेल.

News18
News18
मासे म्हटलं की फिश फ्राय आणि फिश करी प्रामुख्याने हे दोन प्रकार. कोलंबीसारख्या माशाची भजी बनवतात. पण तुम्ही कधी काटे असलेल्या माशांची भजी बनवली आहे का? काटेवाल्या माशांच्या भजीच्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फिश फ्राय आणि फिश करीपेक्षा काही वेगळं बनवायचं असेल तर तुमच्यासाठी ही माशांच्या भजीची रेसिपी.
माशांमध्ये काटे असतात. करीमधील आणि फ्राय केलेल्या माशांमधाील काटे काढतानाच कित्येकांसाठी मुश्किल असतं. अशात काटे असलेल्या माशांची भजी, ती बनवायची कशी आणि खायची कशी असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. एका महिलेने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
advertisement
माशाचे तुकडे करून घ्या आणि ते वाफवून घ्या. वाफवण्यासाठी एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन ते उकळून त्याच्यावर चाळणी ठेवा आणि माशाचे तुकडे या चाळणीत ठेवा. वर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्या. आता यावरील त्वचा सहजपणे निघेल. त्यानंतर तुकड्यांना थोडं दाबून पाहा तुम्हाला जिथं काटा जाणवले तो खेचून सहज बाहेर काढता येईल.
advertisement
आता 3 चमचा तांदळाचं पीठ आणि 3 चमचे बेसन घ्या, मिक्स करून घ्या. आता यात चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा धणे पूड, ओवा, एक-दीड चमचा लाल मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता. अर्धा लिंबाचा रस, 2 टिस्पून तेल टाकून सगळं नीट मिक्स करा. थोडं थोडं पाणी टाकून भजीला करतो तितकं पातळ मिश्रण करून घ्या.
advertisement
कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल तापलं की माशाचे तुकडे तयार केलेल्या मिश्रणात घोळवून तेलात ड्रिप फ्राय करून घ्या. काटेवाल्या माशांची भजी तयार.
advertisement
FULL THAALI युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेने यात हलवा मासा घेतला आहे. तुम्हीसुद्धा या माशाची ही भजी ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Fish Recipe Video : काट्यांच्या माशांची भजी, पण काटे कसे काढायचे? सोपी ट्रिक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Election Manifesto: मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरोग्यासाठी १० मोठ्या घोषणा
मुंबईकरांना मोफत औषधं आणि गल्लीबोळात 'बाईक ॲम्बुलन्स'! ठाकरेंच्या वचननाम्यात आरो
  • 'शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द' अशी टॅगलाईन या जाहीरनाम्यासाठी घेण्यात आली.

  • मुंबईकरांना आरोग्याबाबत मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

  • कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे आ

View All
advertisement