advertisement

Iran War: इराणचा घातक वार! अमेरिकेची महाकाय विमानवाहू नौका भर समुद्रात 'निकामी', व्हाईट हाऊस हादरलं

Last Updated:

अमेरिका-इराण युद्धाच्या १४ व्या दिवशी इराणने अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन विमानवाहू नौकेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने भीषण हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात युद्धनौका निकामी झाली असून ती माघार घेत असल्याचे वृत्त आहे.

इराणचा घातक वार! अमेरिकेची महाकाय विमानवाहू नौका भर समुद्रात 'निकामी', व्हाईट हाऊस हादरलं
इराणचा घातक वार! अमेरिकेची महाकाय विमानवाहू नौका भर समुद्रात 'निकामी', व्हाईट हाऊस हादरलं
तेहरान: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध १४ व्या दिवशीदेखील सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणच्या पलटवारने अमेरिका आणि इस्रायल हैराण झाले आहेत. तर, युद्ध लांबल्याने दोन्ही देशांसह जगातही चिंता व्यक्त केली जात आहे. इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणने अमेरिकेच्या शक्तिशाली युद्धनौकेवर हल्ला केला असल्याचे समोर आले आहे.
अमेरिका-इराण संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एक खळबळजनक दावा केला आहे. पर्शियन गल्फमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेची महाकाय विमानवाहू नौका 'USS अब्राहम लिंकन' वर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनने यशस्वी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

नेमका हल्ला कुठे आणि कसा झाला?

इराणच्या 'सेंट्रल हेडक्वार्टर ऑफ द होली प्रोफेट'ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओमानच्या समुद्रात इराणच्या सागरी सीमेपासून सुमारे ३४० किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनचा वापर करून या विमानवाहू नौकेला लक्ष्य करण्यात आले. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर अमेरिकन युद्धनौका आणि त्यांचा ताफा अत्यंत वेगाने त्या भागातून माघार घेताना (fleeing) दिसला.
advertisement

USS अब्राहम लिंकन निकामी, इराणचा दावा

IRGC ने असा दावा केला आहे की, त्यांच्या अचूक हल्ल्यामुळे ही विमानवाहू नौका आता 'नॉन-ऑपरेशनल' (निकामी) झाली आहे. या मोठ्या नुकसानीमुळे अमेरिकेला ही युद्धनौका गल्फमधून मागे घेण्यास भाग पाडले असून ती आता अमेरिकेकडे परतत आहे. इराणच्या या दाव्याने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही नौका अमेरिकेच्या लष्करी ताकदीचा कणा मानली जाते.
advertisement

अमेरिकेची भूमिका काय?

इराणने इतका मोठा दावा केला असला तरी, अद्याप पेंटागॉन किंवा अमेरिकन सरकारकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यापूर्वीही इराणने असे दावे केले होते, जे अमेरिकेने "क्षेपणास्त्रे जवळही आली नाहीत" असे म्हणून फेटाळून लावले होते. मात्र, आजच्या या दाव्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागात चिंतेचे वातावरण असल्याचे समजते.
advertisement

आखाती देशांत तणाव वाढला

२८ फेब्रुवारीपासून इस्रायली दलांसोबत सुरू असलेल्या हवाई मोहिमेसाठी अमेरिकेने 'USS जेराल्ड आर. फोर्ड' आणि 'USS अब्राहम लिंकन' या दोन विमानवाहू नौका तैनात केल्या होत्या. अब्राहम लिंकनसोबत 'USS स्प्रुअन्स' आणि 'USS मायकल मर्फी' यांसारख्या विनाशक (Destroyers) युद्धनौकाही अरबी समुद्रात गस्त घालत होत्या. आता या दाव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव युद्धाच्या टोकावर पोहोचला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: इराणचा घातक वार! अमेरिकेची महाकाय विमानवाहू नौका भर समुद्रात 'निकामी', व्हाईट हाऊस हादरलं
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement