advertisement

लग्न 4 दिवसांवर, खरेदीही झाली, अचानक तरुणाने संपवलं जीवन, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा, मन हेलावणारी घटना

Last Updated:

भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका २७ वर्षीय तरुणाने लग्नाच्या चार दिवस आधी आयुष्याचा शेवट केला आहे.

bhandara news
bhandara news
सरवर शेख, प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका २७ वर्षीय तरुणाने लग्नाच्या चार दिवस आधी आयुष्याचा शेवट केला आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच नवरदेवानं अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील परसोडी (पावळदवना) इथं घडली असून राजेश अविनाश भेंडारकर असं या तरुणाचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

राजेश हा गेल्या तीन वर्षांपासून चंद्रपूर येथील दालमिया कंपनीत 'सिक्युरिटी गार्ड' म्हणून नोकरीला होता. त्याचं लग्न १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी राजू दोनोडे हिच्याशी होणार होतं. लग्नासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने घरात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास राजेशने घराबाहेरील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement

नवरी मुलगीही घरीच होती

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे सामान आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी नवरी मुलगी वैष्णवी ही सुद्धा ११ मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती. दोघांच्याही घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना राजेशनं असं टोकाचं पाऊल का उचललं, याचं गूढ निर्माण झालं आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. राजेशच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्न 4 दिवसांवर, खरेदीही झाली, अचानक तरुणाने संपवलं जीवन, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा, मन हेलावणारी घटना
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement