T20 World Cup मध्ये पहिली टीम क्वालिफाय, 2 टीम स्पर्धेबाहेर, IND vs PAK च समीकरण काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आज पार पडणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात कोणती तरी एक टीम सूपर 8 मध्ये जाणार आहे. जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर भारत सूपर 8 साठी क्वालिफाय होणार आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
2/7
या हायव्होल्टेज सामन्याला सूरूवात होण्याआधी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पहिली टीम सूपर 8 साठी क्वालिफाय झाली आहे. त्याच्यासोबत दोन टीम या स्पर्धेबाहेर झाल्या आहेत. दरम्यान या टीम कोण आहेत? आणि भारत पाकिस्तानच समीकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
खरं तर आज ग्रुप सी मधल्या वेस्ट इंडिज आणि नेपाल यांच्यात सामना रंगला होता.या सामन्यात वेस्ट इंडिजने नेपालचा 9 विकेट राखून पराभव केला होता. या विजयासह वेस्ट इंडिज सूपर 8 साठी क्वालिफाय झालेली पहिली टीम ठरली आहे.
advertisement
4/7
तसेच या सामन्यातील पराभवानंतर नेपाल स्पर्धेबाहेर झाली आहे. खरं तर नेपालने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला भयंकर झूंजवलं होतं.पण तरी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्या इंग्लंडप्रमाणे इतर संघांसाठी देखील आव्हान निर्माण करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना इटाली आणि वेस्ट इंडिज विरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे आता नेपालचे स्पर्धेतील आव्हान संपूष्ठात आले आहे.
advertisement
5/7
नेपाळच्या आधी ओमानचा संघ देखील स्पर्धेबाहेर झाला आहे. कारण ओमान संघाने झिम्बाबे, श्रीलंका आणि आयरलँड विरूद्ध तीनही सामने हारल्यामुळे ते देखील वर्ल्डकपमधून बाहेर झाले आहेत.
advertisement
6/7
आज पार पडणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात कोणती तरी एक टीम सूपर 8 मध्ये जाणार आहे. जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर भारत सूपर 8 साठी क्वालिफाय होणार आहे.
advertisement
7/7
जर पाकिस्तानने भारताला हरवलं तर ती टीम देखील क्वालिफाय होणार आहे. आणि जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही टीम क्वालिफायच्या शर्यतीत असतील.त्यामुळे सामन्याचा निकाल काय लागतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये पहिली टीम क्वालिफाय, 2 टीम स्पर्धेबाहेर, IND vs PAK च समीकरण काय?