TRENDING:

बर्फासारखी गार होईल Car! कुलिंग होत नसेल तर फक्त करा एवढंच काम, 99 टक्के लोक करता ही चूक!

Last Updated:
बऱ्याच वेळा कार कुलिंग करण्याच्या नादात एसीच बंद पडतो. असं बऱ्याच जणांसोबत होतं. पण, त्याची काही कारणं आहे.
advertisement
1/7
बर्फासारखी गार होईल Car! कुलिंग होत नसेल तर फक्त करा एवढंच काम, 99 टक्के लोक करता ही चूक!
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे या दिवसांमध्ये प्रवास करणे कठीण झालं आहे. अशावेळी कारमध्ये गारेगार प्रवास करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. जर तुमच्याकडे कार असेल तर थंडगार प्रवास करू शकतात. पण, बऱ्याच वेळा कार कुलिंग करण्याच्या नादात एसीच बंद पडतो. असं बऱ्याच जणांसोबत होतो. पण, त्याची काही कारणं आहे. जी सगळ्यांना माहिती नाही. अशावेळी दुरुस्ती करण्यासाठी गेला तर मॅकानिक अतिरिक्त खर्च आकारतो. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर हा खर्च वाचू शकतो. 
advertisement
2/7
कारमध्ये गॅस रिफिलिंग करत असताना काही सोप्या गोष्टी असतात. भारतात सगळीकडे जो फ्रीजमध्ये गॅस असतो तोच सगळीकडे वापरला जातो. R134a नावाचा हा गॅस सर्वाधिक वापरला जातो. जर तुमची कार कुलिंग होत नसेल तर ९० टक्के गॅस लिक झाल्याची समस्या आहे. अशावेळी गॅस संपत नसतो तर लिक झालेला असतो. 
advertisement
3/7
लिकेज कसं ओळखायचं? गॅस भरण्यासाठी मॅकेनिक पहिले लिकेज चेक करत असतो. यासाठी ३०० ते ५०० रुपये खर्च आकारला जातो. जर लिकेज दुरुस्त केलं नाही आणि गॅस भरला तर पुन्हा १५ दिवसांमध्ये हीच समस्या निर्माण होईल, आणि तुमचे पैसे वाया जातील. 
advertisement
4/7
  कम्प्रेसर ऑईल: गॅस रिफिल करत असताना कम्प्रेसर ऑईल सुद्धा भरलं जात असतं. त्यामुळे एसी रिपिअर करणारा मॅकेनिक कॅम्प्रेसर आईल भरतोय की नाही हे पाहिलं पाहिजे. हे ऑईल टाकल्यानंतर एसी हा एकदम स्मूथ चालतो. 
advertisement
5/7
बऱ्याचवेळा एसी रिपिअर करणारे मॅकेनिक हे कुलिंग होत नसेल तर कम्प्रेसर खराब झाला असं सांगतात. याचा खर्च हा १० ते २० हजारांपर्यंत असतो. कम्प्रेसर बदलून घ्या, असं सांगतात. पण, अशी वेळ आली तर दुसऱ्या एखाद्या एसी रिपिअर करणाऱ्या मॅकेनिक करून एसी दाखवून घ्या. बऱ्याच वेळा  एसी फिल्टर (Cabin Filter) खराब झाल्यावर किंवा कंडेंसरवर माती लागली तर कुलिंग कमी होतं. 
advertisement
6/7
सर्व्हिस सेंटर Vs लोकल मॅकेनिक:  कारच्या एसीचं काम करायचं असेल तर अधिकृत सर्व्हिस सेंटरवर काम केलं तर २० ते ३० टक्के खर्च जास्त येईल. सोबतच गॅस आणि इतर साहित्यांची गॅरंटी, वारंटही मिळेल. लोकल मॅकेनिककडे सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. 
advertisement
7/7
कंडेंसरची स्वच्छता - गॅस रिफल करण्याआधी कंडेंसरला प्रेशर वॉशने साफ करा, त्यामुळे हिट एक्सचेंजही दुरस्ती होती आणि कुलिंगही वाढतं. नेहमी चांगल्या दर्जाचा गॅस रिफिल करा. स्वस्त किंवा लोकल असणारा गॅस हा कम्प्रेसरची लाईफ कमी करतो. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
बर्फासारखी गार होईल Car! कुलिंग होत नसेल तर फक्त करा एवढंच काम, 99 टक्के लोक करता ही चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल