T20 World Cup 2026 साठी ऑस्ट्रेलियाने तयार केले तीन जायएन्ट किलर! ज्यांनी रोहितला दिलीये जखम, चीफ सिलेक्टरने नावं सांगितली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 World Cup 2026 Australia : मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ खेळेल. पण या संघात पॅट कमिन्स, टीम डेव्हिड आणि जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांना स्थान मिळालं आहे, जे सध्या फिटनेसच्या समस्यांशी झुंजत आहेत.
advertisement
1/7

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियाने आपला ताफा सज्ज केला असून, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
advertisement
2/7
टीम सिलेक्शनमध्ये काही धक्कादायक निर्णयांसह अनुभवी खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या काही प्रमुख खेळाडूंचा समावेश करून ऑस्ट्रेलियाने मोठी जोखीम पत्करल्याचं बोललं जात आहे.
advertisement
3/7
मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ खेळेल. पण या संघात पॅट कमिन्स, टीम डेव्हिड आणि जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांना स्थान मिळालं आहे, जे सध्या फिटनेसच्या समस्यांशी झुंजत आहेत.
advertisement
4/7
निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केलं की, हे खेळाडू वेगाने सावरत आहेत आणि वर्ल्ड कप सुरू होईपर्यंत ते पूर्णपणे तंदुरुस्त होतील असा विश्वास व्यवस्थापनाला आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड गेम चेंजर ठरतील, असा विश्वास देखील व्यक्त केलाय.
advertisement
5/7
आशियाई पीचची स्पिनर्सला पोषक असलेली परिस्थिती लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन संघाने मॅथ्यू कुहनेमान आणि कूपर कॉनोली यांसारख्या खेळाडूंच्या समावेशासह स्पिनर्स डिपार्टमेंटला अधिक बळ दिलंय.
advertisement
6/7
ऑस्ट्रेलिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 11 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध कोलंबोमध्ये करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघात मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, ॲडम झॅम्पा आणि मार्कस स्टोइनिस यांसारख्या तगड्या खेळाडूंचा भरणा असल्याने हा संघ पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
advertisement
7/7
वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुहनेमान, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम झॅम्पा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 साठी ऑस्ट्रेलियाने तयार केले तीन जायएन्ट किलर! ज्यांनी रोहितला दिलीये जखम, चीफ सिलेक्टरने नावं सांगितली