TRENDING:

जन्मत: आजार, साधं उभंही राहता येत नव्हतं, नव्या वर्षात ‘देवदूत’ भेटला, ‘तो’ थेट चालायला लागला

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: दहा हजार रुग्णांपैकी एखाद्याच रुग्णामध्ये आढळणारी ही अतिशय दुर्मिळ व गुंतागुंतीची केस वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 15 वर्षांच्या मुलासाठी सरते वर्ष आनंदाची नवी पहाट घेऊन आले आहे. जन्मापासून मणक्याच्या गंभीर विकाराशी झुंज देणारा आणि चालण्याची क्षमताही गमावण्याच्या टप्प्यावर पोहोचलेला हा मुलगा, मणकाविकारतज्ज्ञ डॉ. विवेक देशमुख यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 24 तासांत स्वतःच्या पायावर उभा राहिला. दहा हजार रुग्णांपैकी एखाद्याच रुग्णामध्ये आढळणारी ही अतिशय दुर्मिळ व गुंतागुंतीची केस वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar: जन्मत: आजार, साधं उभंही राहता येत नव्हतं, नव्या वर्षात ‘देवदूत’ भेटला, ‘तो’ थेट चालायला लागला (Ai Image)
Chhatrapati Sambhajinagar: जन्मत: आजार, साधं उभंही राहता येत नव्हतं, नव्या वर्षात ‘देवदूत’ भेटला, ‘तो’ थेट चालायला लागला (Ai Image)
advertisement

‎भूल उतरतानाच सकारात्मक संकेत

‎शस्त्रक्रियेनंतर भूल उतरताच मुलाने दोन्ही पाय वर उचलून दाखवले, जे यापूर्वी शक्य नव्हते. साधारणपणे अशा रुग्णांना हालचालींसाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो; मात्र हा मुलगा अवघ्या 24 तासांत वॉर्डमध्ये स्वतः उभा राहिला. या दृश्याने पालकांना भावूक केले. “आमचा मुलगा आम्हाला पुन्हा मिळाला,” अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

advertisement

ऑनलाइन रम्मीचा नाद, सिलेंडरचा अख्खा ट्रकच पळवला, प्लॅन असा की पोलिसही चक्रावले

‎या मुलाला जन्मजात मणक्याचा आजार असल्याने लहान वयातच पाठीत कुबड तयार होऊ लागली होती. शाळेत सहपाठी त्याची चेष्टा करत असल्याने त्याचा आत्मविश्वास खचत गेला. कालांतराने चालताना तोल जाऊ लागला, पायांवर नियंत्रण राहिले नाही आणि अखेरीस पाऊल उचलणेही कठीण झाले. अहिल्यानगरमध्ये विविध ठिकाणी उपचार घेण्यात आले, मात्र शस्त्रक्रियेनंतर मुलगा चालू शकेल की नाही, या भीतीमुळे कुटुंब साशंक होते. अखेर त्यांनी मेडिकव्हर रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

advertisement

‎नेमका काय होता मणक्याचा विकार?

‎मणकाविकारतज्ज्ञ डॉ. विवेक देशमुख यांनी सांगितले की, तपासणीत मुलाचे तीन मणके एकमेकांना चिकटलेले असल्याचे आढळले होते, तसेच मज्जातंतू अत्यंत कमजोर झाल्या होत्या. असे जन्मजात विकार बहुतेक वेळा गर्भावस्थेतील तपासणीत—विशेषतः ‘अनोमली स्कॅन’मध्ये—लवकर निदान होतात. मात्र या प्रकरणात निदान उशिरा झाल्याने 15 वर्षांनंतर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. अशा स्थितीत अर्धांगवायूचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कष्टाचं चीज होणार, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळणार, पण वृषभ राशीवाले यंदा ‘ती’ चूक
सर्व पहा

डॉ. देशमुख यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, लहान मुलांमध्ये मणक्यात बाक, कुबड किंवा वाकडेपणा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. गर्भावस्थेत योग्य तपासण्या झाल्यास अशा गंभीर आजारांचे निदान लवकर होऊ शकते आणि वेळेत उपचार शक्य होतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
जन्मत: आजार, साधं उभंही राहता येत नव्हतं, नव्या वर्षात ‘देवदूत’ भेटला, ‘तो’ थेट चालायला लागला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल