TRENDING:

Team India : ना अभिषेक, ना बुमराह, 'हा' आहे टीम इंडियाचा हुकमी एक्का, वर्ल्डकप आधीच दिग्गजाने सांगून टाकलं

Last Updated:
दोन दिवसात म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 ला टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. तत्पुर्वी सराव सामन्यात टीम इंडियाने आपला दमखम दाखवला आहे.
advertisement
1/7
ना अभिषेक, ना बुमराह, 'हा' आहे टीम इंडियाचा हुकमी एक्का, वर्ल्डकप आधीच दिग्गजाने
दोन दिवसात म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 ला टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. तत्पुर्वी सराव सामन्यात टीम इंडियाने आपला दमखम दाखवला आहे.
advertisement
2/7
सराव सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी 240 धावा चोपल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिका फक्त 210 च धावा करू शकली.त्यामुळे भारताचा 30 धावांनी विजय झाला आहे.
advertisement
3/7
हा सामना पाहूनच भारत किती आक्रामकपणे वर्ल्ड कप खेळणार आहे.हे या सामन्यातून स्पष्ट झाले आहे.
advertisement
4/7
दरम्यान या सामन्यात अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराहच्या खेळीवर सगळ्यांचे लक्ष असणार असल्याचे बोलले जात होते. पण या खेळाडूपेक्षा दुसराच खेळाडू टीम इंडियाचा हुकमी एक्का असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितले आहे.
advertisement
5/7
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मायकल क्लार्कच्या मते हार्दिक पांड्या हा भारताचा हुकमी एक्का असणार आहे. हार्दिक हा वर्ल्ड टी20 क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा खेळाडू आहे.
advertisement
6/7
वर्ल्ड कप हा भारतात खेळवला जातोय. त्यामुळे त्या मैदानावर हार्दिक पांड्या बॅट, बॉल आणि फिल्डींग उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. तर खेळ चांगला समजतो, त्यामुळे भारताच्या विजयात त्याचा मोठा वाटा असणार आहे, तसेच हार्दिकला या वर्ल्डकपमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज दिलं तर नवल वाटायला नको,असे मायकल क्लार्क म्हणाला आहे.
advertisement
7/7
त्यामुळे मायकल क्लार्कच्या मते अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराह नव्हे तर हार्दीक पांड्या हुकमी एक्का ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : ना अभिषेक, ना बुमराह, 'हा' आहे टीम इंडियाचा हुकमी एक्का, वर्ल्डकप आधीच दिग्गजाने सांगून टाकलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल