कोण आहे दीपेश शर्मा, ज्याच्यासोबत जोडलं जातंय शमिता शेट्टीचं नाव? बक्कळ संपत्तीचा मालक, करतो 'हे' काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Who is Deepesh Sharma: ज्या दीपेश शर्मासोबत शमिता शेट्टीचं नाव जोडलं गेलं, तो नेमका आहे तरी कोण?
advertisement
1/9

बॉलिवूडची 'शरारा गर्ल' आणि शिल्पा शेट्टीची लाडकी बहीण शमिता शेट्टी हिने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस खास होता कारण सोबत लाडकी बहीण, जवळचे मित्र आणि कुटुंबाचा गोतावळा होता.
advertisement
2/9
शमिताने स्वतः एक गोंडस व्हिडिओ शेअर करत म्हटलं होतं की, "आणखी एक वर्ष वाढलं, पण आता अधिक समजूतदार आणि आनंदी!" मात्र, हाच वाढदिवस एका वेगळ्याच चर्चेचं कारण ठरला. एका स्पेशल व्यक्तीने शमिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर अफवांचा धुरळा उडाला.
advertisement
3/9
प्रसिद्ध उद्योजक आणि कलाकार दीपेश शर्मा याने शमिताच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही खास अनसीन फोटो शेअर केले. पण फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
4/9
दीपेशने लिहिलं, "जिच्यामुळे मला सतत हसू येतं, त्या माझ्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! जिला माझ्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तरीही ती माझ्यासोबत आहे. लव्ह यू, माय शॅमस्टर!" यावर शमितानेही 'Awww' म्हणत हार्ट इमोजीसह रिप्लाय दिला.
advertisement
5/9
बस! मग काय, "शमिताला नवीन जोडीदार मिळाला," अशा चर्चांना उधाण आलं. मात्र या अफवांनी शमिताचा पारा चढला. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कडक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की, ती कोणालाही डेट करत नाहीये.
advertisement
6/9
शमिता म्हणाली, "मी सिंगल आहे आणि अत्यंत शांततेत माझं आयुष्य जगतेय. केवळ एका खऱ्या मैत्रीचा असा चुकीचा अर्थ काढणं बंद करा. हे सगळं अत्यंत हास्यास्पद आणि निव्वळ मूर्खपणा आहे." तिने अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावत आपल्या आणि दीपेशच्या नात्यावर पडदा टाकला आहे.
advertisement
7/9
ज्या दीपेशसोबत शमिताचं नाव जोडलं गेलं, तो ग्लॅमर वर्ल्डमध्ये चांगलाच सक्रिय आहे. दीपेश हा टेक्नो आर्टिस्ट असून 'मिलाग्रो' आणि 'द कॉकटेल रूम' यांसारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्सचा सह-संस्थापक आहे.
advertisement
8/9
त्याचे सलमान खान आणि संजय दत्त यांसारख्या बड्या सेलिब्रिटींसोबतही जवळचे संबंध आहेत. तो 'ग्लोरी एक्सपिरियन्स' नावाच्या क्लबचा मालक असून आर्टिस्ट मॅनेजमेंटमध्ये त्याचं मोठं नाव आहे.
advertisement
9/9
शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस'मधील सहकलाकार राकेश बापटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. मात्र, जुलै २०२२ मध्ये शमिताने अधिकृतपणे त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे दीपेश शर्मा, ज्याच्यासोबत जोडलं जातंय शमिता शेट्टीचं नाव? बक्कळ संपत्तीचा मालक, करतो 'हे' काम