TRENDING:

IND vs PAK : मॅचआधीच पाकिस्तानने हेरले टीम इंडियाचे 5 विक पॉईंट, सूर्या-गंभीरला बनवायला लागणार प्लान बी!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय झाला आहे. युएसएनंतर भारतीय टीमने नामिबियाला धूळ चारली आहे. या विजयासोबतच टीम इंडिया सुपर-8 मध्ये प्रवेश करण्याच्या आणखी जवळ पोहोचली आहे.
advertisement
1/7
पाकिस्तानने हेरले टीम इंडियाचे 5 विक पॉईंट, सूर्या-गंभीर बनवणार प्लान बी!
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. रविवार 15 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये या दोन्ही टीम समोरासमोर असतील. वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला असला तरी 5 खेळाडूंचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
advertisement
2/7
मागच्या काही काळापासून शिवम दुबेने फिनिशर म्हणून नाव कमावलं आहे. डेथ ओव्हरमध्ये वादळी बॅटिंग करून दुबेने भारताला अनेकदा मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं, पण वर्ल्ड कपच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. युएसएविरुद्ध पहिल्या बॉलला शून्य रनवर आऊट झालेला दुबे नामिबियाविरुद्ध 23 रनवर माघारी परतला.
advertisement
3/7
युएसएविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने 14 रन केले, तर नामिबियाविरुद्ध तो पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. बॉलिंगमध्ये मात्र अक्षर पटेलने चमक दाखवली. अक्षर पटेलने युएसएविरुद्ध 2 आणि नामिबियाविरुद्ध 2 अशा एकूण 4 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
4/7
तिलक वर्माला युएसए आणि नामिबियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये सुरूवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. युएसएविरुद्ध तिलकने 25 आणि नामिबियाविरुद्धही 25 रनचीच खेळी केली.
advertisement
5/7
रिंकू सिंग हा टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला. युएसएविरुद्ध 14 बॉल 6 रन केलेल्या रिंकूने नामिबियाविरुद्ध फक्त 1 रन काढली. रिंकूचा हा फॉर्म पाहता त्याला वर्ल्ड कपच्या पुढच्या सामन्यात संधी मिळेल का? याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
6/7
अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे एक-दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं कॅप्टन सूर्यकुमार यादवने आधीच सांगितलं आहे. त्यामुळे अभिषेकच्या ऐवजी नामिबियाविरुद्ध संजू सॅमसनला संधी मिळाली. संजूने 8 बॉलमध्ये 22 रनची खेळी केली, पण त्याला पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं.
advertisement
7/7
टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंना वर्ल्ड कपच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये सूर गवसलेला नाही, त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी कॅप्टन सूर्या आणि कोच गौतम गंभीरला या खेळाडूंच्या फॉर्मवर तोडगा काढावा लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मॅचआधीच पाकिस्तानने हेरले टीम इंडियाचे 5 विक पॉईंट, सूर्या-गंभीरला बनवायला लागणार प्लान बी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल