TRENDING:

Team India : 20 बॉल खेळून 7 रन केले... विश्वास दाखवला त्याचाच सूर्याला धोका, वर्ल्ड कपच्या दोन्ही मॅचमध्ये फेल!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नामिबियाविरुद्ध मोठा स्कोअर तर उभारला आहे, पण भारतीय टीमच्या बॅटिंगवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
advertisement
1/6
20 बॉल 7 रन... विश्वास दाखवला त्यानेच सूर्याला धोका दिला, दोन्ही मॅचमध्ये फेल!
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 209 रन केले. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी वादळी अर्धशतकं ठोकली. इशान बॅटिंग करत असताना टीम इंडिया 250 रनचा टप्पा पार करेल, असं वाटत होतं.
advertisement
2/6
इशान किशनने 24 बॉलमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 61 रन केले. तर हार्दिक पांड्याने 28 बॉलमध्ये 52 रन केले. हार्दिकने त्याच्या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारले. हार्दिक आणि इशान किशन शिवाय कोणत्याही भारतीय खेळाडूला आक्रमक बॅटिंग करता आली नाही.
advertisement
3/6
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आठव्या क्रमांकापर्यंत बॅटर घेऊन खेळत आहे, पण नामिबियाच्या आधी युएसएविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही भारताची बॅटिंग गडगडली होती. 77 रनवरच भारताच्या 6 विकेट गेल्या होत्या.
advertisement
4/6
युएसए आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंग सपशेल अपयशी ठरत आहे. या दोन सामन्यांमध्ये रिंकूने 20 बॉल खेळून फक्त 7 रन केल्या आहेत. युएसएविरुद्धच्या मॅचमध्ये रिंकूने 14 बॉलमध्ये 6 आणि नामिबियाविरुद्ध 6 बॉलमध्ये 1 रन काढली. या दोन्ही सामन्यांमध्ये रिंकूच्या बॅटलाही बॉल लागत नाहीये.
advertisement
5/6
आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या रिंकूने फिनिशर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. आयपीएलच्या डेथ ओव्हरमध्ये वादळी बॅटिंग केल्यानंतर रिंकूची टीम इंडियात निवड झाली, पण वर्ल्ड कपच्या दोन सामन्यांमध्ये त्याला एकही सिक्स किंवा फोर मारता आलेली नाही.
advertisement
6/6
वर्ल्ड कपच्या पुढच्या स्टेजमध्ये आव्हान आणखी कठीण होत जाईल, तेव्हा रिंकूचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. रिंकूला सूर गवसला नाही तर त्याच्याऐवजी कॅप्टन सूर्यकुमार यादव वॉशिंग्टन सुंदरला संधी देऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 20 बॉल खेळून 7 रन केले... विश्वास दाखवला त्याचाच सूर्याला धोका, वर्ल्ड कपच्या दोन्ही मॅचमध्ये फेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल