TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तानी कॅप्टनची एक चूक ठरली गेम चेंजर, कॅप्टन सूर्याने सांगितलं विजयाचं सिक्रेट!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने दिलेल्या 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये फक्त 114 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
1/6
पाकिस्तानी कॅप्टनची एक चूक ठरली गेम चेंजर,  सूर्याने सांगितलं विजयाचं सिक्रेट!
इशान किशन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कोलंबोच्या कठीण खेळपट्टीवर इशान किशनने 40 बॉलमध्ये 77 रनची वादळी खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
advertisement
2/6
पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला जो चुकीचा ठरला. सूर्याने टॉसवेळीच आपण टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती, असं स्पष्ट केलं. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॅटिंग करूनच जिंकलो आहे, त्यामुळे आम्ही आताही बॅटिंगच घेतली असती, असं म्हणत सूर्याने टीमचे विचार किती स्पष्ट आहेत, ते दाखवून दिलं.
advertisement
3/6
प्रेमदासा स्टेडियमवर इशान किशन वगळता इतर सर्व खेळाडू रन काढण्यासाठी संघर्ष करत होते, त्यामुळे सूर्यकुमार यादवने कोणताही धोका न पत्करता शेवटपर्यंत किल्ला लढवला. 29 बॉलमध्ये 32 रनची खेळी करून सूर्या आऊट झाला, सूर्याने टी-20 स्टाईलने बॅटिंग केली नसली, तरी त्याची ही खेळी टीमसाठी महत्त्वाची ठरली.
advertisement
4/6
दुसरीकडे बॉलिंगच्या वेळीही सूर्याने योग्य ते बदल केले. हार्दिकचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे, हे लक्षात घेऊन सूर्याने इनिंगची सुरूवातच हार्दिकला बॉलिंग देऊन केली. यानंतर हार्दिकने पहिली ओव्हरच मेडन टाकून एक विकेट घेतली.
advertisement
5/6
टीम इंडिया सामन्यात आधीपासूनच पुढे आहे हे लक्षात घेता सूर्याने टीमचं ट्रम्प कार्ड असलेल्या कुलदीप यादवला सुरूवातीला वापरलंच नाही. उलट त्याने अक्षर पटेलला आधीच बॉलिंग दिली आणि अक्षरने मोक्याच्या क्षणी पाकिस्तानच्या 2 विकेट घेतल्या.
advertisement
6/6
कुलदीप यादवचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि कोलंबोची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे, त्यामुळे कुलदीपची फक्त या सामन्यासाठी टीममध्ये निवड झाली. कॅप्टन सूर्यानेही मॅच जिंकत असल्याचं लक्षात येताच कुलदीपची बॉलिंग पाकिस्तानी बॅटरना समजू नये याची काळजी घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानी कॅप्टनची एक चूक ठरली गेम चेंजर, कॅप्टन सूर्याने सांगितलं विजयाचं सिक्रेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल