IND vs PAK : भारत सुपर 8 मध्ये, पाकिस्तान T20 वर्ल्डकपमधून बाहेर होणार का? Points Table चे समीकरण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. भारताने दिलेल्या 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 114 रनच करता आल्या, त्यामुळे भारताचा 61 रननी विजय झाला आहे.
advertisement
1/8

एवढं मोठं टार्गेट मिळाल्यानंतर पहिल्या बॉलपासून पाकिस्तानवर दबाव होता, त्यातच हार्दिक पांड्याने पहिल्याच ओव्हरला साहिबजादा फरहानची विकेट घेऊन पाकिस्तानला दणका दिला. एवढच नाही तर हार्दिकने मेडन ओव्हरही टाकली.
advertisement
2/8
हार्दिकनंतर बुमराहने दुसऱ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बुमराहने सॅम अयुब आणि सलमान आघाची विकेट घेतली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये बसलेल्या या 3 धक्क्यांनंतर पाकिस्तान सावरलीच नाही.
advertisement
3/8
भारताकडून हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.
advertisement
4/8
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 175 रन केले. इशान किशनने 40 बॉलमध्ये 77 रनची वादळी खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 32, तिलक वर्माने 25 आणि शिवम दुबेने 27 रन केले.
advertisement
5/8
पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये प्रवेश झाला आहे. युएसए, नामिबिया आणि पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचे 3 सामन्यात 3 विजयांसह 6 पॉईंट्स आहेत. ग्रुप स्टेजमधला भारताचा शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध आहे.
advertisement
6/8
दुसरीकडे पाकिस्तानवर मात्र ग्रुप स्टेजलाच वर्ल्ड कपबाहेर व्हायचं संकट ओढावलं आहे. पाकिस्तानला आता नामिबियाविरुद्धचा त्यांचा सामना जिंकावाच लागणार आहे. या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला तर मात्र त्यांना पॅक अप करावा लागू शकतो.
advertisement
7/8
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर युएसए दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. 4 सामन्यांमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह युएसएचे 4 पॉईंट्स आहेत. तर पाकिस्तानचे 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एका पराभवासह 4 पॉईंट्सच आहेत.
advertisement
8/8
पाकिस्तानचा नेट रनरेट हा -0.403 आहे तर युएसएचा नेट रनरेट हा +0.787 आहे, त्यामुळे सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला नामिबियाविरुद्ध विजय गरजेचा आहे. नामिबियाविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाला तर मात्र ग्रुप ए मधून भारत आणि युएसए या टीम सुपर-8 मध्ये प्रवेश करतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारत सुपर 8 मध्ये, पाकिस्तान T20 वर्ल्डकपमधून बाहेर होणार का? Points Table चे समीकरण