Team India : सेमी फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोघांना नारळ... इंग्लंडविरुद्ध सूर्या कठोर निर्णय घेणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या शेवटच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. संजू सॅमसन हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
advertisement
1/11

वेस्ट इंडिजने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून केला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला टीम इंडियाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
advertisement
2/11
संजू सॅमसनने या सामन्यात 50 बॉलमध्ये 194 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 97 रन केले, ज्यात 4 सिक्स आणि 12 फोरचा समावेश होता. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला भारतीय खेळाडूचा हा सर्वोत्तम स्कोअर आहे. या कामगिरीबद्दल संजूला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
3/11
वेस्ट इंडिजचा पराभव करून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. गुरूवार 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनलची लढत होईल.
advertisement
4/11
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाने सगळ्यात मोठा विजय मिळवला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव टीममधल्या दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्याचा विचार करू शकतो, कारण या दोघांचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे.
advertisement
5/11
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसला. 11 बॉलमध्ये 10 रन करून अभिषेक आऊट झाला. ओव्हरला 17 रन आलेल्या असतानाही त्याने बेजबाबदार शॉट मारला, तसंच त्याने फिल्डिंगमध्येही दोन सोपे कॅच सोडले.
advertisement
6/11
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 15 रन केले, पण यातही त्याला बॅटला बॉल लावण्यात अडचणी येत होत्या. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने अर्धशतक केलं, पण वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला पुन्हा अपयश आलं.
advertisement
7/11
अभिषेकचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला इंग्लंडविरुद्ध सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात बाहेर ठेवलं जाऊ शकतं. संजू आणि इशान हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे या दोघांना ओपनिंगला पाठवून रिंकू सिंगला फिनिशर म्हणून संधी मिळू शकते.
advertisement
8/11
टीम इंडियासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे वरुण चक्रवर्ती. मिस्ट्री स्पिनर असलेल्या वरुण चक्रवर्तीसमोर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी अगदी सहज बॅटिंग केली. वरुणच्या 4 ओव्हरमध्ये 40 रन आले यात त्याला एक विकेट मिळाली.
advertisement
9/11
वेस्ट इंडिजला स्पिन बॉलिंगचा सामना करताना अडचणी येतात, पण वरुणच्या बॉलिंगवर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आक्रमण केलं. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याची कामगिरी निराशाजनक झाली. वरुणने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 47 रन देऊन 1 विकेट घेतली.
advertisement
10/11
वरुण चक्रवर्तीला टीमबाहेर करायचं असेल, तर भारतीय टीमकडे कुलदीप यादवचा पर्याय आहे. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा हे टी-20 क्रमवारीमध्ये नंबर वन बॉलर आणि नंबर वन बॅटर आहेत, पण या क्रमवारीला साजेशी कामगिरी दोघांनाही करता आलेली नाही.
advertisement
11/11
भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : सेमी फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोघांना नारळ... इंग्लंडविरुद्ध सूर्या कठोर निर्णय घेणार!