T20 वर्ल्ड कपचं समीकरण फिरलं, पॉईंट्स टेबलमध्ये भूकंप, 2 बलाढ्य टीम ग्रुप स्टेजलाच घरी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये मागच्या 24 तासांमध्ये दोन मोठे उलटफेर झाले आहेत, त्यामुळे दोन दिग्गज टीमसमोर ग्रुप स्टेजलाच स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट उभं ठाकलं आहे. आता एकही चूक या टीमचं स्पर्धेतलं आव्हान संपवू शकतं.
advertisement
1/9

शनिवार 7 फेब्रुवारी पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली. पहिल्या दिवसापासूनच नेदरलँड्स, अमेरिका, नेपाळ, अफगाणिस्तान या टीमनी क्रिकेटमधल्या दादा टीमना घाम फोडला, पण त्यांना उलटफेर करता आला नाही.
advertisement
2/9
अखेर 5 दिवसांनी गुरूवारी वर्ल्ड कपमधला पहिला उलटफेर झाला. आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने नेपाळचा एकही विकेट न गमावता पराभव केला. इटलीचे ओपनर जस्टीन आणि ऍन्थनी मोस्का यांनी नाबाद अर्धशतक करून ऐतिहासिक विजय मिळवला.
advertisement
3/9
इटलीचा हा उलटफेर ताजा असतानाच शुक्रवारी दुपारी झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 रननी धूळ चारली. झिम्बाब्वेने दिलेलं 170 रनचं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाचा 19.3 ओव्हरमध्ये 146 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
4/9
इटली आणि झिम्बाब्वेने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मात्र भूकंप आला आहे. आता एक जरी चूक झाली तरी दोन बलाढ्य टीमचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येऊ शकतं.
advertisement
5/9
ग्रुप बी मध्ये श्रीलंका पहिल्या आणि झिम्बाब्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीमनी त्यांच्या 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 2 पैकी 1 सामना जिंकला आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला.
advertisement
6/9
ऑस्ट्रेलियाचे उरलेले सामने श्रीलंका आणि ओमानविरुद्ध आहेत. तर झिम्बाब्वेचे उरलेले दोन सामने आयर्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध शिल्लक आहेत. श्रीलंका त्यांचे उरलेले दोन सामने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
advertisement
7/9
उरलेल्या दोन सामन्यांमध्ये एकही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल आणि श्रीलंका आणि झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-2 टीम या सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत.
advertisement
8/9
ग्रुप सी मध्ये वेस्ट इंडिज 2 सामन्यात 2 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्कॉटलंड दुसऱ्या, इटली तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. या तीनही टीमनी 1 सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
advertisement
9/9
इंग्लंडचा नेट रनरेट हा स्कॉटलंड आणि इटलीपेक्षाही खराब आहे, त्यामुळे इंग्लंडला सुपर-8 ला क्वालिफाय होण्यासाठी स्कॉटलंड आणि इटलीचा पराभव करावा लागणार आहे, अन्यथा इंग्लंडचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपचं समीकरण फिरलं, पॉईंट्स टेबलमध्ये भूकंप, 2 बलाढ्य टीम ग्रुप स्टेजलाच घरी!