WPL 2026 : PM मोदींच्या भेटीतही चर्चेत, कपिल शर्मा शो ही गाजवला, पण मैदानात झिरो ठरली खेळाडू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंकप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत एक खेळाडू प्रचंड चर्चेत आली होती.
advertisement
1/7

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंकप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत एक खेळाडू प्रचंड चर्चेत आली होती.
advertisement
2/7
विशेष म्हणजे चर्चेतील हीच खेळाडू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती प्रचंड गाजली देखील होती.पण मैदानात आज ती फ्लॉप ठरली.
advertisement
3/7
ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून टीम इंडियाची स्टार आणि युपी वॉरियर्सची हरलीन देओल आहे. हरलीने देओल आज युपी वॉरियर्सकडून गुजरात जाएट्स विरूद्ध सामना खेळली.
advertisement
4/7
या सामन्यात संघ संकटात असताना हरलीन देओलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ती शु्न्य धावांवर बाद झाली. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली.
advertisement
5/7
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरातने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरियर्स 197 धावापर्यंत मजल मारू शकली होती. त्यामुळे गुजरात जाएंटसने 10 धावांनी पराभव झाला होता.
advertisement
6/7
या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीची सूरूवात चांगली झाली नाही. कारण किरन नवगिरे स्वस्तात बाद झाली.त्यानंतर कॅप्टन मेग लॅन्निंग आणि फोईब लिचफिल्डने संघाचा डाव सावरला होता. यावेळी मेग लॅन्निंग 30 वर बाद झाली.
advertisement
7/7
मेग लॅन्निंग बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षांच्या फोईब लिचफिल्डने 40 बॉलमध्ये 78 धावांची खेळी केली होती. या खेळीत तिने 5 षटकार आणि 8 षटकार लगावले होते. फोईब लिचफिल्ड ही 15 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आऊट झाली आणि इथेच सगळी मॅच फिरली. आणि गुजरातने सामन्यात वापसी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : PM मोदींच्या भेटीतही चर्चेत, कपिल शर्मा शो ही गाजवला, पण मैदानात झिरो ठरली खेळाडू