TRENDING:

2017 ची फक्त ती एक चूक आणि Hero नंबर वन बनला झिरो! गोविंदाचं करिअरच संपलं, कमबॅक करणंही मुश्किल

Last Updated:
Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा ज्याच्या फक्त नावानेच फिल्म हिट व्हायच्या. आता त्याच्यासोबतचे कलाकार आपली जादू करत असताना गोविंदाचा जलवा मात्र गेल्या 9 वर्षांत फिका पडला आहे. याचं कारण आहे, त्याची एक चूक.
advertisement
1/7
2017 ची फक्त ती एक चूक आणि Hero नंबर वन बनला झिरो! गोविंदाचं करिअरच संपलं, कमबॅक करणंही मुश्किल
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 अशी गोविंदाची ओळख. 90 च्या दशकात गोविंदाची जादू होती, त्याच्यासमोर खान आणि कपूरही फिके पडत होते. पण काही वर्षांनी नशिबाने वेगळाच डाव साधला. 9 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर असा टर्निंग पॉइंट आला ज्यामुळे गोविंदाची शानदार कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली.
advertisement
2/7
2014-15 चा तो काळ. गोविंदाने 'किल दिल' आणि 'हॅपी एंडिंग'सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्याच्यातील मेन हिरो जिवंत होता. त्याला सहाय्यक भूमिका साकारण्यात आनंद वाटत नव्हता.
advertisement
3/7
2017 मध्ये त्याने 'आ गया हीरो' या फिल्मद्वारे मेन हिरो म्हणून कम चित्रपटाद्वारे भव्य पुनरागमनाची योजना आखली होती. त्याने स्वतः या चित्रपटाची निर्मिती आणि प्रसिद्धी केली.  गोविंदाने 90 च्या दशकातील तोच जुना फॉर्म्युला, तेच भडक रंगांचे कपडे आणि त्याच जुन्या पद्धतीचे ॲक्शन सीक्वेन्स आणले, जे पूर्णपणे कालबाह्य वाटत होते. कारण 2017 सालचा प्रेक्षकवर्ग बदलला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला.
advertisement
4/7
या फिल्मनंतर त्याने कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेही फक्त फेल ठरले नाहीत तर गोविंदाची प्रतिष्ठाही कमी केली.
advertisement
5/7
काळानुसार स्वतःला न बदलणं ही गोविंदाची सर्वात मोठी चूक होती. अनिल कपूर आणि संजय दत्त असे गोविंदाचे सहकलाकार त्यांच्या वयाला साजेशा गंभीर आणि दमदार भूमिका निवडत असताना गोविंदाने 25 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारण्याचा हट्ट धरला. असं म्हणतात की त्याने फिल्ममध्ये फक्त लीड रोल नसल्याने अनेक मोठे प्रोजेक्ट्स नाकारले. त्याची 'नाही' म्हणण्याची आणि सेटवर उशिरा येण्याची सवय मोठ्या दिग्दर्शकांना त्याच्यापासून दूर घेऊन गेली.
advertisement
6/7
2007 सालचा 'पार्टनर' हा चित्रपट गोविंदाच्या कारकिर्दीतील शेवटचा मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. सलमान खानसोबतची त्याची जोडी प्रचंड यशस्वी ठरली होती. सलमान-गोविंदाची ही जोडी पुढेही टिकेल अशी आशा होती, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, परस्पर मतभेद आणि व्यावसायिक वादामुळे ही जोडी तुटली. त्यानंतर गोविंदा एकटा पडला. इंडस्ट्रीतील गटबाजीच्या या काळात मोठ्या बॅनरच्या पाठिंब्याशिवाय गोविंदाचा संघर्ष अधिकच कठीण झाला.
advertisement
7/7
पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असताना, गोविंदा वारंवार वादांमध्ये अडकला. कधी त्याचा भाचा कृष्णा अभिषेकसोबतचे कौटुंबिक भांडण, तर कधी ज्येष्ठ दिग्दर्शकांविरुद्ध केलेली त्याची कठोर टीका. या वादांमुळे त्याची प्रतिमा वादग्रस्त व्यक्तीमध्ये बदलली. प्रेक्षक त्याला चित्रपटांपेक्षा डान्स रिॲलिटी शोमधील परीक्षक म्हणून अधिक पाहू लागले, ज्यामुळे त्याच्या चित्रपटसृष्टीतील स्टारडम आणखी कमी झालं. आता त्याचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन अशक्य वाटतं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2017 ची फक्त ती एक चूक आणि Hero नंबर वन बनला झिरो! गोविंदाचं करिअरच संपलं, कमबॅक करणंही मुश्किल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल