TRENDING:

Bigg Boss Marathi 6 लव्हर्ससाठी मोठी अपडेट, या दिवशी मिळणार विजेता; फिनालेची तारीख आली समोर

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या फिनालेची तारीख अखेर समोर आली आहे.
advertisement
1/8
Bigg Boss Marathi 6 लव्हर्ससाठी मोठी अपडेट, या दिवशी मिळणार विजेता; फिनालेची तारीख आली समोर
बिग बॉस मराठी 6 ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. घरातले टास्क, भांडणं, मैत्री आणि भावनिक क्षण यामुळे हा सीझन चांगलाच रंगला आहे. आता शोला तब्बल 70 दिवस पूर्ण झाले असून फक्त 30 दिवसांचा खेळ बाकी राहिला आहे.
advertisement
2/8
या सीझनचा सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच बिग बॉस मराठी 6 चा फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. अखेर या उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे.
advertisement
3/8
सध्या बिग बॉस मराठी 6 मध्ये टॉप 10 स्पर्धक उरले आहेत आणि त्यांच्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. या यादीत विशाल कोटीयन, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, अनुश्री माने, राकेश बापट, प्रभू, रेवा कौरसे, संकेत पाठक, राखी सावंत आणि सागर कारंडे यांचा समावेश आहे.
advertisement
4/8
प्रत्येक स्पर्धक आपापल्या पद्धतीने गेम खेळत आहेत. काही जण टास्कमध्ये आघाडी घेत आहेत तर काहीजण आपल्या स्वभावामुळे चर्चेत आहेत. टॉप 10 स्पर्धक समोर आल्यानंतर आता विजेत्याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगली आहे.
advertisement
5/8
उरलेल्या 30 दिवसांत स्पर्धकांना अधिक कठीण टास्कना सामोरं जावं लागणार आहे. याच काळात खरी स्पर्धा रंगणार असून, कोण टिकून राहतो आणि कोण बाहेर पडतो, हे ठरणार आहे.
advertisement
6/8
मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे. फिनालेच्या तारखेचा खुलासा अत्यंत खास पद्धतीने झाला. सध्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. यावेळी स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी घरात येऊन त्यांना सरप्राईज दिलं.
advertisement
7/8
वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या संकेत पाठकची पत्नी आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम हिने घरात येत संकेतला भेट दिली. दोघांची भेट खूपच भावनिक होती. घरातून बाहेर पडताना सुपर्णाने संकेतला मिठी मारत एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं. ती म्हणाली, "आता आपण 19 एप्रिलला भेटू." या एका वाक्यातूनच फिनालेची तारीख स्पष्ट झाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
8/8
19 एप्रिलच्या ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.बिग बॉस मराठी 6 चा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तुम्हाला कोण विजेता होईल असं वाटतं? त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 लव्हर्ससाठी मोठी अपडेट, या दिवशी मिळणार विजेता; फिनालेची तारीख आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल