बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे कुलर मिळतात. त्याचे अनेक मॉडेल्स आणि वेगवेगले फीचर्स असतात. अशावेळी योग्य फीचर्स असलेला कूलर खरेदी करावा, जो कमी बजेटमध्येही उत्तम कूलिंग देऊ शकतो. खरगोन येथील कूलर विक्रेते आणि उत्पादक नीरज राठोड यांनी योग्य कुलर कसे निवडावे आणि कुलरमध्ये काय काय असावे याबद्दल माहिती दिली आहे.
असं निवडा तुमच्यासाठी बेस्ट कुलर..
advertisement
- तज्ञांच्यामते, सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक कुलर्समध्ये हनीकॉम्ब कूलिंग पॅड्स असतात. हे जुन्या गवताच्या पॅड्सपेक्षा जास्त चांगले कूलिंग करतात आणि जास्त काळ टिकतात. हनीकॉम्ब पॅड्स हवा अधिक थंड आणि स्वच्छ करतात. त्यामुळे, नवीन कूलर खरेदी करताना या वैशिष्ट्याला प्राधान्य देण्याची शिफारस तज्ञ करतात.
- तुमचं घर मोठा असेल किंवा जिथे तुम्ही कुलर ठेवणार असाल तर रूम जर मोठी असेल तर मोठ्या टाकीचा कूलर सर्वोत्तम असतो. कारण कूलरची पाण्याची टाकी जितकी मोठी असेल, तितका तो जास्त वेळ चालतो. लहान खोल्यांसाठी लहान टाकी असलेले कुलर तुम्ही घेऊ शकता. कुलरची टाकी मोठी असेल तर रात्रीच्या वेळी तो वापरणं सोपायीच होतं. कारण त्यात वारंवार पाणी भरावं लागत नाही.
- बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात वीजपुरवठा काहीवेळासाठी बंद होतो. अशा परिस्थितीत, घरात बसणं अवघड होतं आणि बाहेरही जाता येत नाही. त्यामुळे इन्व्हर्टर-वर चालणार कूलर तुम्ही घेतला पोहिजे. हे कुलर कमी वीजेवरही चांगले चालतात. कमी वीज वापरणारा कूलर खरेदी केल्याने तुमचं विजेचं बिलही कमी होतं. म्हणून कुलर खरेदी करताना तो किती वीज वापरू शकतो, हेदेखील तपासा.
- हल्ली बऱ्याच कुलरमध्ये बर्फ टाकण्यासाठी आईस चेंबरची सोय असते. कूलरमध्ये बर्फ टाकल्याने हवा आणखी थंड होते आणि कडक आराम मिळतो. कुलरमध्ये 4-वे एअर डिफ्लेक्शन फीचर असेल तर त्यामुळे हवा रूमच्या सर्व कोपऱ्यात पोहोचते. हे फीचर विशेषतः मोठ्या खोल्या किंवा हॉलसाठी फायदेशीर आहे. म्हणून डबल टॅन्क असलेलं कूलर जास्त फायदेशीर असते.
कूलर घेताना केवळ त्याचे फीचर्स नाही तर त्याच्या बॉडीचीही तपासणी करा. कुलरची बॉडी चांगल्या गुणवत्तेची आहे की नाही हे पाहा. शक्यतो मजबूत प्लास्टिक बॉडी असलेले कूलर निवडा. कारण ते लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ टिकतात. तसेच कूलरची चाकं, पाण्याची पातळी दाखवणारं चिन्ह असे काही फीचर्सदेखील कुलरमध्ये असावे. म्हणजे ते वापरणं आणखी सोपं होतं.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
