TRENDING:

Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर डंका! 7 दिवसांत 4 डिजिट कमाई, 'जवान'ला टाकलं मागे?

Last Updated:
Dhurandhar 2 Box Office Collection : आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने रिलीजच्या अवघ्या 7 दिवसांत 4 डिजिट कमाई केली आहे. सिनेमाने शाहरुख खानच्या 'जवान'ला मागे टाकलं का?
advertisement
1/8
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर डंका! 7 दिवसांत 4 डिजिट कमाई, 'जवान'ला टाकलं मागे?
रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने 'कांतारा चॅप्टर 2', 'ॲनिमल' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या चित्रपटांना मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 भारतीय चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर वेगाने प्रगती करत आहे. हा चित्रपट आता प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. त्या चित्रपटाने जगभरात आपल्या संपूर्ण प्रदर्शनकाळात 1042.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
2/8
'धुरंधर: द रिव्हेंज' लवकरच प्रभासच्या 'कल्की 2' ला मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. पुढचा मोठा टप्पा 'जवान'चा असेल ज्याने जगभरात 1160 कोटी रुपयांची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या एका अहवालानुसार, 'धुरंधर 2: द रिव्हेंज'ने जगभरात एकूण 994.58 कोटी रुपये कमावले आहेत.
advertisement
3/8
'धुरंधर: द रिव्हेंज'ने भारतात 744.57 कोटी रुपये आणि परदेशात 250 कोटी रुपये कमावले आहेत.ही एकूण कमाईच्या 26.67 टक्के आहे, या चित्रपटाने निव्वळ कमाईत 623.42 कोटी रुपये कमावले आहेत. बुधवारी सातव्या दिवशी, 'धुरंधर 2' ने भारतात अंदाजे 47.70 कोटी रुपये कमावले.
advertisement
4/8
'धुरंधर 2' ने भारतातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतातील एकूण कमाई 687.49 कोटी आहे. निव्वळ वाटा 73.33 टक्के आहे. प्रेक्षकांची प्रशंसा आणि पुन्हा पुन्हा पाहण्यामुळे चित्रपटाची गती कायम असून तो सर्व प्रदेशांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
advertisement
5/8
सहाव्या दिवशी, 'धुरंधर 2' ने 56.55 कोटी कमावले.  एकूण भारतीय कमाई 575.67 कोटी झाली आहे. हिंदी वर्जन 52 कोटींसह आघाडीवर आहे.
advertisement
6/8
'धुरंधर: द रिव्हेंज' ने पेड प्री बुकींगमध्ये 18 मार्च रोजी 12,735  शो आयोजित करण्यात आले होते. तांत्रिक अडचणींमुळे काही शो रद्द करण्यात आले. दिग्दर्शक आदित्य धर यांनी एक सार्वजनिक निवेदन जारी करून प्रेक्षकांची माफी मागितली आणि भविष्यातील स्क्रिनिंगमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
advertisement
7/8
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या "धुरंधर: द रिव्हेंज" या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला. या चित्रपटाने 13,00 कोटींहून अधिक कमाई केली.
advertisement
8/8
आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने जगभरात 1,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'पुष्पा 2: द रूल'च्या यादीत सहभागी झाला आहे.  जागतिक स्तरावर 1,000 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात फास्ट प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंग आणि अल्लू अर्जुन या दोघांच्याही चित्रपटांनी अवघ्या 7 दिवसांत हा पराक्रम केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर डंका! 7 दिवसांत 4 डिजिट कमाई, 'जवान'ला टाकलं मागे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल