कन्या पूजन करताना 'ही' दिशा ठरते अत्यंत अशुभ, देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज; कोणती दिशा ठरते शुभ?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नवरात्रीच्या या पावन पर्वात कन्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वास्तुशास्त्रानुसार कन्या पूजन करताना केवळ विधीच नाही, तर 'दिशा' देखील अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
1/7

आज 26 मार्च 2026, चैत्र नवरात्रीची अष्टमी आणि राम नवमी एकाच दिवशी साजरी केली जात आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात कन्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वास्तुशास्त्रानुसार कन्या पूजन करताना केवळ विधीच नाही, तर 'दिशा' देखील अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
2/7
'ही' दिशा आहे अत्यंत अशुभ: वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण आणि पश्चिम या दिशांना तोंड करून कन्या पूजन करणे किंवा कन्यांना या दिशेला बसवणे अत्यंत अशुभ मानले जाते. या दिशांना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे येथे बसून केलेली पूजा देवीपर्यंत पोहोचत नाही, अशी मान्यता आहे.
advertisement
3/7
पूजेसाठी सर्वोत्तम दिशा: कन्या पूजनासाठी घरातील ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशा सर्वात उत्तम मानली जाते. कन्यांना बसवताना त्यांचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
advertisement
4/7
अग्नि कोनाचा प्रभाव: काही तज्ज्ञांच्या मते, माता दुर्गा ही शक्ती आणि अग्नीचे प्रतीक असल्याने घराच्या अग्नि कोनात कन्या पूजन करणे विशेष फलदायी ठरते. यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
advertisement
5/7
कन्यांना बसवण्याची जागा: कन्यांना थेट जमिनीवर बसवू नका. त्यांना बसवण्यासाठी स्वच्छ आसन किंवा लाकडी चौरंग वापरावा. वास्तुशास्त्रानुसार, आसन हे लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे असावे, जे देवीला प्रिय आहेत. काळपट किंवा फाटलेले आसन वापरणे टाळावे.
advertisement
6/7
पूजेचे स्थान स्वच्छ ठेवा: ज्या ठिकाणी तुम्ही कन्या पूजन करणार आहात, ती जागा पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र असावी. त्या जागेजवळ चप्पल-बूट किंवा कचरा नसावा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पूजा स्थानी स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष दूर होतात आणि शुभ ऊर्जा वाढते.
advertisement
7/7
पूजन करणाऱ्याचे मुख: कन्यांची पूजा करताना आणि त्यांना भोजन देताना तुमचे स्वतःचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य किंवा पाद्य देणे शास्त्रानुसार वर्ज्य मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कन्या पूजन करताना 'ही' दिशा ठरते अत्यंत अशुभ, देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज; कोणती दिशा ठरते शुभ?