TRENDING:

Airtelच्या या प्लॅनने यूझर्सची होईल मज्जा! सर्वात कमी किंमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी

Last Updated:
Airtel Users: तुम्ही एअरटेल यूझर्स असाल आणि कमी किमतीत दीर्घ व्हॅलिडिटीचा प्लॅन हवा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. चला तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगतो, जो रिचार्ज करून तुम्ही संपूर्ण वर्षभर मोफत असाल. 
advertisement
1/5
Airtelच्या या प्लॅनने यूझर्सची होईल मज्जा! कमी किंमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी
Airtel Network: एअरटेल ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात त्याचे यूझर्स कोट्यवधींमध्ये आहेत. आजकाल, अनेक मोबाईल यूझर्स वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळण्यासाठी दीर्घ व्हॅलिडिटीसह रिचार्ज प्लॅन खरेदी करणे पसंत करतात. तुम्ही एअरटेल यूझर्स असाल आणि कमी किमतीत दीर्घ व्हॅलिडिटीचा प्लॅन हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. चला तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगतो, जो रिचार्ज करून तुम्ही संपूर्ण वर्षभर मोफत असाल. 
advertisement
2/5
पूर्वी, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या सर्व प्लॅनमध्ये डेटा आणि फ्री कॉलिंग सुविधा देत असत. परंतु, यामुळे डेटाची आवश्यकता नसलेल्या यूझर्ससाठी योजना महाग झाल्या. या समस्येवर मात करण्यासाठी, ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केवळ व्हॉइस-ओन्ली प्लॅन सुरू करण्याचे निर्देश दिले.
advertisement
3/5
Airtelचा 1849 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : ट्रायच्या सूचनांचे पालन करून, एअरटेल लाखो यूझर्ससाठी फक्त 1849 रुपयांचा परवडणारा रिचार्ज प्लॅन देखील देत आहे. तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल आणि वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. 
advertisement
4/5
एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभर सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. हे अशा यूझर्ससाठी परिपूर्ण आहे ज्यांना फक्त डेटाशिवाय कॉलिंगची आवश्यकता आहे.
advertisement
5/5
याशिवाय, या योजनेत, यूझर्सना संपूर्ण 365 दिवसांसाठी एकूण 3600 फ्री एसएमएस देखील मिळतात, जे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर पाठवू शकता. यूझर्सना Apollo 24|7 Circleची सुविधा तीन महिन्यांसाठी मिळते. याशिवाय, यूझर्स दरमहा फ्री कॉलर ट्यून सेट करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Airtelच्या या प्लॅनने यूझर्सची होईल मज्जा! सर्वात कमी किंमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल