TRENDING:

iPhone यूझर्स लगेच करा हे काम! अ‍ॅपलचा सल्ला, अन्यथा होऊ शकतो सायबर अटॅक

Last Updated:
Apple ने iPhone यूझर्सला iOS 26.3 अपडेट इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये अनेक असे बग्स फिक्स करण्यात आले आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर आयफोन अ‍ॅक्सेस करु शकत आहेत.
advertisement
1/5
iPhone यूझर्स लगेच करा हे काम! अ‍ॅपलचा सल्ला, अन्यथा होऊ शकतो सायबर अटॅक 
Apple ने याच आठवड्यात iOS 26.3 अपडेट रोल आउट केला होता. तुम्ही आयफोन यूझर असाल तर अव्हेलेबल होताच हे अपडेट इंस्टॉल करा. स्वतः अॅपलने हा सल्ला दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की, iOS 26.3 मध्ये अनेक बग फिक्स आणि सिक्योरिटी अपडेटचा समावेश आहे. अॅपलने यामध्ये 39 सिक्योरिटी बग्सचे पॅचेस जारी केले आहेत. या 39 बग्समध्ये एक असा बग आहे, ज्याचा वापर आयफोनच्या हॅकिंगसाठी केला जात आहे.
advertisement
2/5
या बगमुळे होत होता हॅकिंगचा प्रयत्न : अॅपलने सांगितले की, डायनामिक लिंक एडिटरशी संबंधित एक सुरक्षा बगचा दुरुपयोग केला जात होता. ज्यावेळी आयफोन किंवा मॅकबुकवर कोणता प्रोगाम लॉन्च होतो तेव्हा सर्वात आधी हाच कोड ओपन होतो. या कोडमधील त्रुटीमुळे हॅकर्सना तुमच्या आयफोनमध्ये प्रवेश मिळू शकला असता.
advertisement
3/5
अॅपलने हे मान्य केले आहे आणि म्हटले आहे की त्यांना या समस्येची जाणीव आहे. हॅकर्स तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकले असते. कंपनीने आता ते दुरुस्त केले आहे.
advertisement
4/5
अपडेट इंस्टॉल करण्यात उशीर करु नका : तुमच्याजवळ आयफोन असेल आणि तुम्ही जुन्या सॉफ्टेवेयरचा वापर करत असाल तर ते तत्काळ अपडेट करा. आपल्या आयफोनमध्ये iOS 26.3 इंस्टॉल करण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन जनरलमध्ये जा आणि हे सॉफ्टवेयर अपडेटवर टॅप करा. यानंतर इंस्ट्रक्शन फॉलो करत अपडेट इंस्टॉल करा.
advertisement
5/5
iOS 26.3 मध्ये आयफोनने अँड्रॉइडवर डेटा शेयरिंग झाली सोपी : iOS 26.3 मध्ये अॅपलने बग फिक्स करणे आणि ओव्हरऑल सिस्टम स्टेबिलिटी सुधारण्यावर जोर दिला आहे. खरंतर यामध्ये एक नवीन प्रोसेस जोडण्यात आली आहे. जी आयफोन ते अँड्रॉइड आणि अँड्रॉइड ते आयफोन स्विच करणे सोपे करते. अॅपलने या अपडेटमध्ये टूल जोडले आहे. ज्यामुले क्रॉस-प्लॅटफॉर्म शेयरिंग सोपी होईल. याच्या मदतीने यूझर्स आपल्या आयफोनला अँड्रॉइड फोनजवळ ठेवून अॅप्स, फोटोज, मेसेज आणि फोननंबर इत्यादी शेयर करु शकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iPhone यूझर्स लगेच करा हे काम! अ‍ॅपलचा सल्ला, अन्यथा होऊ शकतो सायबर अटॅक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल