TRENDING:

WhatsApp वर प्रत्येक यूझरला मिळेल नवीन ताकद, स्वतः चेंज करु शकतील चॅटचा रंग

Last Updated:
व्हॉट्सॲपवर यूजर्सना चॅटसाठी थीम सेट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. हे फीचर कसे असेल याचा स्क्रीनशॉटही समोर आलाय. चला या फीचरबद्दल जाणून घ्या आणि ते कसे असेल ते पाहू या.
advertisement
1/5
WhatsApp वर प्रत्येक यूझरला मिळेल नवीन ताकद, स्वतः चेंज करु शकतील चॅटचा रंग
व्हॉट्सॲपवर रोज नवनवीन फीचर्स मिळतात, त्यामुळे चॅटिंगमधील मजा वाढतच जाते. आता कंपनीने आणखी एक अपडेट जारी केले आहे, जे प्रत्येक यूझरला नवीन पॉवर देईल. खरंतर, कंपनी लवकरच एक फीचर आणतेय. ज्याद्वारे यूझर्स चॅटसाठी विविध थीम डिझाइन सिलेक्ट करु शकतील. WABetaInfo ने या फीचरबद्दल माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि बीटा टेस्टर्ससाठी अजून तयार नाही. मात्र, आगामी अपडेट्समध्ये ते सादर केले जाऊ शकते, असं सांगितलं जातंय.
advertisement
2/5
या फीचरचा वापर करुन यूझर्स थीममध्ये दिलेल्या ऑप्शनमधून चॅट बबल आणि वॉलपेपरसाठी त्यांचे आवडते रंग निवडून त्यांचा चॅट इंटरफेस कस्टमाइज करु शकतील.
advertisement
3/5
खरंतर हे नवीन कस्टमायझेशन टूल सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे आणि असे दिसते की ऑफिशियल रिलीझ होण्यापूर्वी WhatsApp या फीचर्समध्ये आणखी सुधारणा करू इच्छित आहे. जेणेकरुन यूझर्स या इंटरफेसमधून त्यांच्या आवडत्या थीम निवडू शकतील आणि चॅटिंग मजेदार बनवू शकतील.
advertisement
4/5
या थीम कशा असतील हे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी, WB ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये दिसतंय की, नवीन फीचरमध्ये अँड्रॉइड ॲपसाठी अनेक डिझाइन स्टाइलसह नवीन थीमवर काम करत आहे, जे आगामी अपडेटमध्ये रिलीज केले जाऊ शकतात. या अपडेटमध्ये, असे दिसून आले आहे की WhatsApp 11 डीफॉल्ट चॅट थीम डिझाइन करत आहे, जेणेकरून कलेक्शन यूझर्ससाठी जास्त मोठा आणि कस्टमाइज करता येईल.
advertisement
5/5
ज्यावेळी यूझर्स एखादी थीम सिलेक्ट करतात. तेव्हा वॉलपेपर आणि चॅट बबल कलर दोन्ही तुम्ही सिलेक्ट केलेल्या स्टाइलच्या हिशोबाने सेट होतील. या फीचरसाठी यूझर्सना सेटिंगमध्ये थीम कस्टमाइझ करण्याचा वेगळा ऑप्शन दिला जाईल, जिथून ते आगामी काळात हे नवीन फीचर वापरू शकतील असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp वर प्रत्येक यूझरला मिळेल नवीन ताकद, स्वतः चेंज करु शकतील चॅटचा रंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल