TRENDING:

Flipkart Sale 'या' दिवशी होणार सुरु! iPhone, स्मार्टवॉचसह सर्वच मिळेल स्वस्तात

Last Updated:
Flipkart Big Saving Days Sale: तुम्हाला स्वस्त वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा लाभ घेऊ शकता. Flipkart चा हा नवीन सेल अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. यामध्ये स्वस्त दरात आयफोन, स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
advertisement
1/6
Flipkart Sale 'या' दिवशी होणार सुरु! iPhone, स्मार्टवॉचसह सर्वच मिळेल स्वस्तात
Flipkart Big Saving Days Sale 2024: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ऑनलाइन सेलमध्ये स्वस्त वस्तू उपलब्ध आहेत. म्हणूनच प्रत्येकजण फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मच्या सेलची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्हीही स्वस्त वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन सेलची वाट पाहत असाल, तर फ्लिपकार्टचा नवा सेल सुरू होणार आहे.
advertisement
2/6
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्हाला आयफोन, स्मार्टवॉच, स्मार्टफोनसह विविध उत्पादने स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 20 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.
advertisement
3/6
फ्लिपकार्टच्या आगामी सेलद्वारे तुम्ही केवळ खरेदीच करू शकणार नाही तर बचतही करू शकता. येथे तुम्हाला शानदार डिस्काउंट ऑफर मिळतील. ज्याच्या मदतीने तुम्ही मोठी बचत करू शकता. म्हणून, जर तुम्ही काहीही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आतापासून विशलिस्ट बनवा. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचे डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
4/6
Flipkart Sale: स्मार्टफोन स्वस्तात मिळतील : तुम्ही स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तो फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमधून खरेदी करू शकता. हा सेल 20 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 25 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल. यामध्ये iPhone 15 Plus, Nothing CMF Phone 1, Vivo T3 Pro, Poco M6 5G सारख्या स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट मिळणार आहे.
advertisement
5/6
स्मार्टवॉच आणि गॅझेट्स ऑफर : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल स्मार्टवॉच खरेदीवर बचत देखील प्रदान करेल. हा सेल सुरू होईल, तेव्हा तुम्ही फक्त 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत नवीन स्मार्टवॉच खरेदी करू शकाल. याशिवाय चार्जर आणि केबलवर 70 टक्के डिस्काउंट मिळेल आणि मोबाईल कव्हर 499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तुम्हाला फास्ट चार्जिंग पॉवरबँकवर किमान 50 टक्के सूट मिळेल.
advertisement
6/6
फर्निचरवरही सूट : फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये केवळ गॅजेट्सच नाही तर इतर वस्तूही स्वस्त दरात उपलब्ध होतील. तुम्ही घरासाठी नवीन बेड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये 6,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत नवीन बेड मिळेल. वॉर्डरोबची सुरुवातीची किंमत 5,490 रुपये असेल, तर ऑफिस चेअरची किंमत 2,490 रुपयांपासून सुरू होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Flipkart Sale 'या' दिवशी होणार सुरु! iPhone, स्मार्टवॉचसह सर्वच मिळेल स्वस्तात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल