तुमचा स्मार्टफोन वायब्रेट कसा होतो? जबरदस्त आहे या यामागील टेक्नॉलॉजी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Smartphone Vibration: आपल्याला ज्यावेळी कॉल किंवा मेसेजचं नोटिफिकेशन येतं. तेव्हा आपला स्मार्टफोन हा हळूच व्हायब्रेट करत असतो. पण असं नेमकं का होतं? कधी विचार केलाय?
advertisement
1/7

Smartphone Vibration: सध्या टेक्नॉलॉजीचं युग सुरु आहे. या काळात अनेक टेक डिव्हायसेस आपण वापरत असतो. पण ते कसे काम करतात हे आपल्याला माहितीच नसतं. स्मार्टफोनही त्यातूनच एक आहे. फोन आल्यावर किंवा मेसेजचं नोटिफिकेशन आल्यावर स्मार्टफोन वायब्रेट होतो. पण ते कसे होते तुम्हाला माहितीये का?
advertisement
2/7
हे छोटसं वायब्रेशन तुम्हाला खुप साधं वाटत असेल पण यामागे एक रंजक टेक्नॉलॉजी काम करते. स्मार्टफोनच्या आत लावलेली खास मोटर सिस्टम एक कंपन निर्माण करते. जी साउंडच्या जागी स्पर्शाच्या माध्यमातून सूचना देण्याचे काम करते.
advertisement
3/7
व्हायब्रेशन मोटर म्हणजे काय? : स्मार्टफोनमध्ये कंपन निर्माण करण्यासाठी लहान इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जातो. सुरुवातीच्या फोनमध्ये प्रामुख्याने ERM (Eccentric Rotating Mass) मोटर्स वापरल्या जात असत. या मोटरमध्ये धातूचा एक गोल तुकडा असतो जो असंतुलित पद्धतीने मोटरला जोडलेला असतो. मोटर फिरत असताना, असंतुलनामुळे कंपन निर्माण होतात, ज्यामुळे फोन व्हायब्रेट होतो. ही टेक्नॉलॉजी सोपे आणि स्वस्त आहे, म्हणून तिचा वापर दीर्घकाळापासून केला जात आहे.
advertisement
4/7
LRA आणि हॅप्टिक फीडबॅकची नवी दुनिया : आधुनिक स्मार्टफोनमध्ये आता LRA (Linear Resonant Actuator) टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे. ही पारंपारिक मोटरपेक्षा जास्त अचूक आणि वेगवान प्रतिक्रिया देते.यामध्ये एक चुंबकीय कॉइल आणि स्प्रिंग मॅकेनिज्म असते. जे खुप नियंत्रित पद्धतीने मागे-पुढे मूव्ह करते. याच कारणामुळे फोनमध्ये मिळणारे वायब्रेशन जास्त स्मूद आणि प्रीमियम फील होते. याला हॅप्टिक फीडबॅक म्हटले जाते. जे टच केल्यावर हल्के झटका देऊन यूझरला फिजिकल बटणसारखा अनुभव देते.
advertisement
5/7
सॉफ्टवेअर कंपन कसे नियंत्रित करते? : कंपन हे फक्त हार्डवेअरची कमाल नाही; सॉफ्टवेअर देखील एक महत्त्वाची भूमिका बजावते. फोनची ऑपरेटिंग सिस्टम वेगवेगळ्या सूचनांसाठी वेगवेगळे पॅटर्न सेट करते. उदाहरणार्थ, कॉलसाठी जास्त कंपन, मेसेजसाठी कमी कंपन किंवा गेम खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे फीडबॅक. म्हणूनच प्रत्येक अलर्ट वेगळा वाटतो.
advertisement
6/7
ही टेक्नॉलॉजी का आवश्यक? : वायब्रएशन टेक्नॉलॉजी पक्त सायलेंट मोडसाठी नाही. तर अॅक्सेसिबिलिटीसाठी महत्वाची आहे. ऐकण्यात अडचण असणाऱ्या यूझर्ससाठी हा एक महत्त्वाचा संकेत असतो. या व्यतिरिक्त गेमिंग आणि टायपिंग दरम्यान चांगला अनुभव देण्यातही हॅप्टिक टेक्नॉलॉजी मोठे योगदान देते.
advertisement
7/7
आजचा स्मार्टफोन फक्त आवाज किंवा स्क्रीनपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. वायब्रेशनसारख्या टेक्नॉलॉजी याला जास्त इंटरॅक्टिव्ह आणि स्मार्ट बनवते. पुढच्यावेळी तुमच्या फोन वायब्रेट करेल तेव्हा समजून घ्या की, यामागे एक खुप बारीक आणि अडव्हान्स टेक्नॉलॉजी सिस्टम काम करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
तुमचा स्मार्टफोन वायब्रेट कसा होतो? जबरदस्त आहे या यामागील टेक्नॉलॉजी