TRENDING:

Spam Callsने त्रस्त झालाय? या ट्रिकने पुन्हा येणारच नाहीत, त्रास होईल दूर

Last Updated:
Tech Tips: स्पॅम कॉल्स तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर येणारे स्पॅम कॉल थांबवू शकाल. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
advertisement
1/7
Spam Callsने त्रस्त झालाय? या ट्रिकने पुन्हा येणारच नाहीत, त्रास होईल दूर
Tech Tips: कोणतेही काम करत असताना जर तुम्हाला फोन आला तर त्रास होणे स्वाभाविक आहे. परंतु जर हा कॉल स्पॅम असेल तर खूप जास्त राग येतो. स्पॅम कॉल येण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही; कॉलर कधीही कॉल करू शकतो.
advertisement
2/7
काही लोक स्पॅम कॉल्सद्वारे पॉलिसी विकण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक फसवणूकीसाठी त्यांचा वापर करत असतात. स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असले तरी, हे कॉल्स अनेक यूझर्सना त्रास देण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. तुम्हालाही वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्सचा त्रास होत असेल, तर आता तुमची चिंता दूर होणार आहे.
advertisement
3/7
स्पॅम कॉल थांबवण्याचा मार्ग म्हणजे DND सर्व्हिस ऑन करणे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे ही सर्व्हिस ऑनलाइन अॅक्टिव्ह करू शकता. स्पॅम कॉल थांबवण्यासाठी, तुम्हाला TSP वेबसाइट म्हणजेच Telecom regulatory Authority of india च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला स्पॅम ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि Know More वर टॅप करावे लागेल.
advertisement
4/7
येथे Preference Registration चा ऑप्शन निवडा. यानंतर, TSP Website for - Preference Registration निवडा. येथे तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरचा (जियो, एअरटेल किंवा VI) लिंक पर्याय निवडा.
advertisement
5/7
येथे आपल्या टेलिकॉम ऑपरेटर (जिओ, एअरटेल किंवा व्हीआय) च्या लिंक ऑप्शनला सिलेक्ट करा. नवीन पेज उघडल्यानंतर, मोबाईल नंबर एंटर करा. यानंतर OTP द्वारे मोबाईल नंबर व्हेरिफाय करा. येथे तुम्हाला Check DND status निवडावे लागेल.
advertisement
6/7
यानंतर, नवीन पेज उघडताच, 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी, तुम्हाला ब्लॉक प्रमोशन ऑप्शन निवडावा लागेल आणि तो चालू करावा लागेल. यानंतर Deactivate हा ऑप्शन निवडावा लागेल. असे केल्याने, स्पॅम कॉल येणे थांबू शकते.
advertisement
7/7
याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, स्पॅम कॉल थांबवण्यासाठी तुम्ही ट्रू कॉलर अ‍ॅपची मदत घेऊ शकता. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही स्पॅम कॉल ओळखू शकता आणि ब्लॉक करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Spam Callsने त्रस्त झालाय? या ट्रिकने पुन्हा येणारच नाहीत, त्रास होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल