Freeze ची कूलिंग खुप कमी होते का? एक्सपर्टला बोलावण्यापूर्वी ट्राय करा या 5 ट्रिक्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Refrigerator Not Cooling Tips : रेफ्रिजरेटरमध्ये थोडीशीही समस्या आली तर लोक ताबडतोब इलेक्ट्रिशियनला फोन करतात. तुम्हालाही तुमच्या रेफ्रिजरेटरच्या कूलिंगविषयी प्रॉब्लम येत असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून रेफ्रिजरेटरची कुलिंग वाढवू शकता.
advertisement
1/7

नवी दिल्ली : आजकाल रेफ्रिजरेटर जवळजवळ प्रत्येक घरात उपलब्ध आहे. आपण अनेकदा अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. अशा परिस्थितीत, अनेक लोकांसाठी रेफ्रिजरेटर त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. उष्णता इतकी तीव्र आहे की लोक रेफ्रिजरेटरशिवाय एक तासही राहू शकत नाहीत.
advertisement
2/7
रेफ्रिजरेटरमध्ये थोडीशीही समस्या आली तर आपण ताबडतोब इलेक्ट्रिशियनला फोन करतो. यामुळे त्यांचा खर्च वाढतो. तुम्हालाही तुमच्या रेफ्रिजरेटरच्या कूलिंगचा त्रास होत असेल, तर इलेक्ट्रिशियनला कॉल करण्यापूर्वी तुम्ही काही टिप्स वापरून पाहू शकता, ज्यामुळे रेफ्रिजरेटरची कूलिंग वाढू शकते.
advertisement
3/7
रेफ्रिजरेटरचे दरवाजे चेक करा : बहुतेक वेळा, रेफ्रिजरेटरमध्ये थंड होण्याच्या समस्या दरवाजा व्यवस्थित बंद न झाल्यामुळे होतात. बऱ्याचदा लोक रेफ्रिजरेटरचा दरवाजा बराच वेळ उघडा ठेवतात, ज्यामुळे कूलिंग कमी होते. रेफ्रिजरेटरचा दरवाजा व्यवस्थित बंद आहे याची खात्री करा जेणेकरून ते व्यवस्थित थंड होईल. रेफ्रिजरेटरचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसेल तर तो बदलून घ्या.
advertisement
4/7
कूलेंट चेक करा : रेफ्रिजरेटर व्यवस्थित थंड न होण्याचे आणखी एक सामान्य कारण म्हणजे कमी कूलेंट. सोप्या शब्दांत सांगायचे तर, थंड करणारा वायू संपला आहे. हे रेफ्रिजरेटर जुने असल्यामुळे किंवा गळतीमुळे असू शकते. तुमचा रेफ्रिजरेटर व्यवस्थित थंड होत नसेल, तर चांगल्या कूलिंगसाठी कूलंट टॉप अप करा.
advertisement
5/7
टेम्प्रेचर सेटिंग चेक करा : कधीकधी रेफ्रिजरेटरचे तापमान योग्यरित्या सेट केलेले नसते. कदाचित हे हिवाळ्याच्या हंगामानुसार सेट केले गेले असु शकते. ज्यामुळे उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर कमी थंड होतो. रेफ्रिजरेटरचे तापमान कमी करा आणि ते व्यवस्थित थंड होत आहे का ते तपासा. आम्ही तुम्हाला सांगतो, रेफ्रिजरेटरसाठी आयडियल तापमान 35-38°F (1-3°C) दरम्यान असते.
advertisement
6/7
कंडेन्सर कॉइल स्वच्छ करा : कंडेन्सर कॉइल घाणेरडी असल्याने रेफ्रिजरेटर जास्त गरम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, वेळोवेळी कंडेन्सर कॉइल साफ करत रहा. यासाठी तुम्ही मऊ ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. यामुळे कॉइल पूर्णपणे स्वच्छ होईल. रेफ्रिजरेटरच्या मागे किंवा खाली असलेल्या कॉइल्स मऊ ब्रश किंवा व्हॅक्यूमने स्वच्छ करा.
advertisement
7/7
पॉवर केबल चेक करा : सर्वात महत्त्वाची गोष्टी जी तुम्हील चेक केली पाहिजे. ती म्हणजे रेफ्रिजरेटरची पॉवर केबल आणि वीजेचा पुरवठा आहे. अनेक वेळा उंदीर तारा कापतात ज्यामुळे वीज व्यवस्थित मिळत नाही. रेफ्रिजरेटर प्लग इन केलेला नाही किंवा चुकून बंद झालेला तर नाही ना याची खात्री करण्यासाठी एकदा चेक करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Freeze ची कूलिंग खुप कमी होते का? एक्सपर्टला बोलावण्यापूर्वी ट्राय करा या 5 ट्रिक्स