TRENDING:

Samsungचा प्रीमियम फोन 25 हजार रुपयांनी झाला स्वस्त! कॅमेरा, बॅटरी सर्व एकापेक्षा एक

Last Updated:
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विविध उपकरणांवर मोठी सूट मिळत असते. आज एका स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट जबरदस्त सूट देतेय. सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर तब्बल 25 हजार रुपयांची सूट दिली जातेय.
advertisement
1/7
Samsungचा प्रीमियम फोन 25 हजार रुपयांनी झाला स्वस्त! कॅमेरा, बॅटरी सर्व एकापेक्षा एक
सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा सध्या एक शानदार डीलसह उपलब्ध झालीये. यावर जबरदस्त डील मिळतेय. जी पाहून प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणारे खुश होतील. सॅमसंग गॅलेक्सी S26 Ultra सारखे नवे मॉडल्स खुप महाग मिळतात. मात्र आता S26 Ultra अगदी कमी किंमतीत उपलब्ध होत आहे.
advertisement
2/7
फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी S24 Ultra ची किंमत 1,34,999 रुपयांनी कमी होऊन आता 1,09,999 रुपये झाली आहे. म्हणजेच तुम्हाला थेट 25 हजार रुपयांचं डिस्काउंट दिलं जातंय. यासोबतच तुम्ही SBI किंवा Axis Bank कार्डचा वापर केला. तर किंमत आणखी कमी होऊन 1,05,999 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
advertisement
3/7
तुम्ही जुना फोन एक्सचेंज करुन 47,350 रुपयांपर्यंत अॅडिशनल सूट मिळवू शकता. खरंतर एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या डिव्हाइसची कंडीशनवर अवलंबून असेल. ईएमआय ऑप्शनही उपलब्ध आहे. ज्याची सुरुवात जवळपास 3,868 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होते.
advertisement
4/7
सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रामध्ये 6.8-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. जो शानदार ब्राइटनेस आणि कलर देतो. यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 गॅलेक्सी प्रोसेसर आणि 12GB RAM दिली आहे. ज्यामुळे परफॉर्मेंस खुप स्मूद राहतो.
advertisement
5/7
यामध्ये 200MP चा क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 3x आणि 5x टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. बॅटरी 5,000mAh ची आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आता प्रश्न निर्माण होतो की, हा फोन खरेदी करावा का? तर तुम्ही जुन्या सॅमसंग गॅलेक्सी S21 किंवा त्याहून जुन्या फोनमध्ये अपग्रेड करत असाल तर ही डील तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरू शकते.
advertisement
6/7
तुम्हाला चांगला परफॉर्मेंस, कॅमेरा आणि बॅटरी लाइफचा फायदा मिळेल. खरंतर तुम्ही पहिल्यापासून सॅमसंग गॅलेक्सी S23 Ultra वापरत असाल तर तुम्हाला जास्त मोठा अपग्रेड जाणवणार नाही.
advertisement
7/7
एकूण 1 लाख रुपयांच्या आसपास फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही डील व्हॅल्यू फॉर मनी ठरू शकते. विशेषतः अशा यूझर्ससाठी ज्यांना S Pen, कॅमेरा आणि लांब सॉफ्टवेयर सपोर्ट हवा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Samsungचा प्रीमियम फोन 25 हजार रुपयांनी झाला स्वस्त! कॅमेरा, बॅटरी सर्व एकापेक्षा एक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल