TRENDING:

Wi-Fi वापरणाऱ्यांनो आधी हे वाचा! हॅकर्स करू शकतात तुमचा गेम, लगेच चेक करा या गोष्टी

Last Updated:
WiFi Hacked Marathi News: आजच्या इंटरनेटच्या काळात बरेच लोकं हे घरात वायफाय लावतात. मात्र यावर आता हॅकर्सची नजर आहे. ज्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.
advertisement
1/7
Wi-Fi वापरणाऱ्यांनो आधी हे वाचा! हॅकर्स करू शकतात तुमचा गेम, लगेच चेक करा या गोष्टी
मुंबई : सध्या डिजिटल युग सुरू आहे. या काळात संपूर्ण जग हे इंटरनेटवर चालतंय. लोकं विविध गॅझेट्सचा वापर करताय. दरम्यान स्वस्त गॅझेट्स आणि मोफत अॅप्सचा वापर तुमच्यावर वाईट परिणाम करू शकते. अनेक लोक माहिती नसलेल्या ब्रांडचे डिव्हाइस किंवा फ्री सर्व्हिस असणाऱ्या अॅप्सचा वापर करतात. ज्यामुळे त्यांचा खर्च वाटतो. पण नुकसान गंभीर होऊ शकते. कोणत्याही माहितीशिवाय तुमचं वायफाय दुसऱ्या कोणाच्या कंट्रोलमध्ये जाऊ शकतं आणि याचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला जाऊ शकतो.
advertisement
2/7
सध्याच्या रिपोर्ट्समधून समोर आलंय की, हॅकर्स मोठं नेटवर्क तयार करतंय. याला बॉटनेक म्हटलं जातं. या नेटवर्क्सच्या माध्यमातून ते लोकांचे इंटरनेट कनेक्शन आपल्या कामासाठी वापरतात. यामध्ये एक खास प्रकारचं सॉफ्टवेयर लावलं जातं. जे तुमच्या इंटरनेटला दुसऱ्यांसाठी रूट करते. म्हणजेच तिसरीच व्यक्ती तुमचं वायफाय वापरत असते. मात्र तुम्हाला याची माहितीही नसते.
advertisement
3/7
हा धोका फक्त हॅकिंगपर्यंत मर्यादित नाही. तर यामागे अनेक टेक्नॉलॉजी काम करते. अनेकदा स्वस्त किंवा अनोळखी ब्रांडचे स्मार्ट डिव्हाइस पहिल्यापासूनच अशा सॉफ्टवेयरसोबत येतात जे तुमचे नेटवर्क शेअर करतात. तसंच दुसरीकडे काही अॅप्सही या खेळीचा भाग असतात. विशेषतः असे अॅप्स जे फ्री व्हीपीएन, पेड कंटेंट मोफत देणे किंवा पैसे कमावण्याचं आमिष दाखवतात.
advertisement
4/7
हे अनेकदा तुमचं इंटरनेट दुसरीकडे पाठवतता. यामुळे तुमचं नेटवर्क एखाद्या संशयित अॅक्टिविहिटीसाठी वापरलं जाऊ शकतो. यामध्ये डेटा चोरी आणि बेकायदेशीर ऑनलाइन कामांचा समावेश असतो.
advertisement
5/7
चिंतेची गोष्ट म्हणजे, तुमच्या इंटरनेटचा वापर चुकीच्या कामांसाठी झाला तर तपासात तुमच्यावर संशय येऊ शकतो. मग तुम्ही काही चुकीचं केलं नसलं तरीही आयपी अॅड्रेस हा पुरावा बनतो. यासोबतच तुमची पर्सनल माहितीही धोक्यात येऊ शकते. कारण असे सॉफ्टवेयर तुमच्या डेटापर्यंत पोहोचू शकतात.
advertisement
6/7
अशा अडचणी टाळण्यासाठी आपल्या वायफाय नेटवर्कवर नजर ठवा. तुमचे डिव्हाइस कोणकोणत्या नेटवर्कला जोडले आहे, यात कोणी अनोळखी तर नाही ना हे वारंवार चेक करत राहा. आपल्या फोन किंवा इतर डिव्हाइसमध्ये इंस्टॉल केलेले अॅप्सही लक्षपूर्वक पाहात. जे अॅप्स संशयित वाटत आहेत किंवा गरजेपेक्षा जास्त परमिशन मागत आहेत ते लगेच हटवा.
advertisement
7/7
घरात वापरल्या जाणाऱ्या स्मार्ट डिव्हाइसवरही लक्ष देणं गरजेचं आहे. स्वस्त आणि विश्वास नसणाऱ्या ब्रांडच्या प्रोडक्ट्सपासून दूर राहा. कारण त्यात लपलेले सॉफ्टवेयरची जोखिम जास्त असते. नेहमी विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरुनच अॅप डाउनलोड करा. आपले सर्व डिव्हाइस अपडेट ठेवा. जेणेकरुन सिक्योरिटी कमकुवत होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Wi-Fi वापरणाऱ्यांनो आधी हे वाचा! हॅकर्स करू शकतात तुमचा गेम, लगेच चेक करा या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल