TRENDING:

Split की Window AC! 1 तास चालवल्यावर कोणाला लागते जास्त वीज? एकदा पाहाच

Last Updated:
Split Vs Windows AC: उन्हाळा सुरू झालाय. या काळात एसी खुप गरजेचा असतो. अशावेळी स्प्लिट एसी खरेदी करावा की विंडो एसी खरेदी करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण पाहूया की, कोणत्या एसीला जास्त वीज लागते.
advertisement
1/5
Split की Window AC! 1 तास चालवल्यावर कोणाला लागते जास्त वीज? एकदा पाहाच
Split Vs Windows AC: देशभरातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. अशावेळी एसी महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळा येताच अनेक घरांमधील एसी सुरू होतात. तर काही लोक हे एसी खरेदी करण्याच्या तयारीत असतात. पण एसी खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की, Split AC घ्यावा की Window AC? या दोन्हीपैकी जास्त वीज बिल कोणत्या एसीला येतं हे जाणून घेणंही महत्वाचं आहे. अनेक लोकांना वाटतं की, Split AC जास्त महाग असतात. यामुळेच ती जास्त वीजही खात असेल. पण सत्य काही वेगळंच आहे.
advertisement
2/5
1 तासात किती वीज खातात या एसी? : तुम्ही सामान्यतः पाहिलं तर 1.5 टनचा Window AC एसी एक तासात जवळपास 1.5 ते 1.8 यूनिट वीज खर्च करतो. तसंच त्याच क्षमतेचा Split AC जवळपास 1.2 ते 1.6 यूनिट दरम्यान वीज खर्च करतो. म्हणजेच Split AC थोडी कमी वीज खर्च करते. ती इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह असते तेव्हा आणखी कमी वीज खर्च करते.
advertisement
3/5
इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीचा मोठा फरक : सध्याच्या काळात बाजारात मिळणारे जास्तीत जास्त Split AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह येतात. ही टेक्नॉलॉजी कंप्रेसरची स्पीड गरजेच्या हिशोबाने कमी-जास्त करते. ज्यामुळे वीजेची बचत होते. दुसरीकडे Window AC सामान्यतः फिक्स्ड स्पीडवर काम करते. ज्यामुळे ते वारंवार ऑन-ऑफ होते आणि जास्त वीज खर्च होते.
advertisement
4/5
खोलीची साइज आणि वापरावर अवलंबून : वीजेची वापर फक्त एसीच्या प्रकारावर अवलंबून राहत नाही तर तो खोलीचा आकार, तापमान सेटिंग आणि वापरावरही खुप अवलंबून असतो. खोली मोठी असेल आणि एसी लहान असेल तर ते जास्त मेहनत करेल आणि वीजही जास्त लागेल. अशाप्रकारे तुम्ही तापमानखुप कमी ठेवले तर वीज बिल वाढू शकतं.
advertisement
5/5
कोणता एसी बेस्ट? : तुम्ही दीर्घ कालावधीपर्यंत एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि वीज बचत करायची असेल तर Split AC बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. खरंतर या एसीची सुरुवातीची किंमत थोडी जास्त असते. पण वेळेसह वीज बिल बचत करते. तसंच तुमचं बजेट कमी असेल आणि खोली लहान असेल तर Window AC देखील एक चांगला आणि परवडणारा ऑप्शन ठरू शकतो. थेट शब्दात बोलायचं झाल्यास, 1 तासाच्या वापरात Split AC,विशेषतः इन्व्हर्टर मॉडल विंडो एसीच्या तुलनेत कमी वीज वापरते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Split की Window AC! 1 तास चालवल्यावर कोणाला लागते जास्त वीज? एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल